Headlines

चुकीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले? घाबरू नका अश्या प्रकारे मिळवू शकता ते पैसे परत !

देशात डिजिटलच्या आगमनाने ऑनलाईन पेमेंट आणि मनी ट्रान्सफरचा ट्रेंड खूपच वाढला आहे. त्यामुळे अनेकदा आपण पैसे ट्रान्सफर करताना नेटबँकिंग, मनी ट्रान्सफर, मोबाईल वॉलेट, NEFT याचा वापर करतात. फार कमी वेळात या उपायांच्या माध्यमातून आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो. ही सुविधा जितकी सोपी आहे तितकीच ती जोखमीची देखील आहे. बर्‍याच वेळा आपण पैसे ट्रान्सफर करण्यात घाई करतो आणि पैसे चुकीच्या खात्यावर पाठवले जातात.

अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत ज्यामध्ये चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत किंवा एखाद्याने ऑनलाइन फसवणूक केल्यामुळे पैसे ट्रान्सफर केले आहेत. अशा अनेक घटनाही समोर आल्या आहेत ज्यामध्ये केवळ मिस कॉल देऊन खात्यातून पैसे उकळले गेले आहेत. अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज आम्ही तुम्हाला चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले असतील तर ते परत मिळवण्यासाठी काय करायचे ते सांगणार आहोत.

चुकीने दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास दोन दिवसाच्या आत तुमच्या बँकेत त्वरित याबाबत सूचना द्या. या सूचनेमध्ये तुम्हाला त्या केलेल्या ऑनलाईन व्यवहाराचे ट्रान्झॅकशन आय डी आणि सोबत त्या ट्रान्झॅकशनची पूर्ण माहिती देणारी प्रिंट बँकेत द्यावी लागेल.

आणि सोबत तुमच्याकडून झालेल्या चुकीची पूर्ण माहिती अर्ज स्वरूपात बँकेत द्यावी लागेल. तुमच्या सूचनेच्या आधारे बँक त्या व्यक्तीला सूचना देईल, ज्याच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत. चुकून ट्रान्सफर झालेले पैसे परत करण्यासाठी बँक त्या व्यक्तीची परवानगी मागेल.

ज्या व्यक्तीला पैसे चुकून ट्रान्सफर झाले आहेत, तो व्यक्ती पैसे परत करण्यास नकार देत असल्यास, त्याच्याविरोधात कोर्टात तक्रार दाखल करता येऊ शकते. तक्रार करताना आपण दिलेली माहिती तपासून पहिली जाते की, आपले पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर झाले आहेत की कोणीतरी चुकीच्या मार्गाने आपल्या अकाउंटमधून पैसे काढले आहेत.

माहिती तपासून झाल्यानंतर बँक आपल्याला आपले पैसे परत करते. परंतु यासाठी आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं. पैसे परत न केल्यास, हा अधिकार आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करण्याच्या संदर्भात आहे. चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास तात्काळ बँकेला याबाबत सूचित करा.

तुमचं आणि पैसे ट्रान्सफर झालेल्या व्यक्तीची बँक एकच असल्यास ही प्रोसेस जलद होण्यास मदत होते. पैसे एक-दोन दिवसांत पुन्हा खात्यात जमा होऊ शकतात. मात्र बँक जर वेगळी असेल तर या गोष्टीसाठी वेळ लागू शकतो.

भारतीय रिझर्व्ह बँकच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लाभार्थ्याच्या खात्याची योग्य माहिती देणे ही लिंक करणाऱ्याची जबाबदारी आहे. जर, काही कारणास्तव, केवळ लिंक करणाऱ्याकडून चूक झाल्यास बँक जबाबदार असणार नाही. चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाल्यास ते परत मिळवण्यासाठी आरबीआयच्या काही तरतुदी आहेत;

१. बँकेला संपर्क करणे. २. बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधणे. ३. पुरावा सादर करणे.  ४. कोर्टाची पायरी.
५. काळजी घेणे आवश्यक.

या सर्व तरतुदी आहेत परंतु बँकेचा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी २ ते ३ वेळा अकाउंट नंबर आणि बँक डिटेल्सची खात्री करून घ्या. कारण एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर ह्या गोष्टीसाठी खूप मनःस्ताप करण्याची वेळ येऊ शकते. सदरची माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत खातरजमा करून घ्यावी.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !