या आहेत भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रसिद्ध वजनदार अभिनेत्री, नंबर ४ वाली तर आहे तब्बल ९२ किलो वजनाची !

bollyreport
4 Min Read

सध्याच्या युगात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात अग्रेसर होत आहेत. मग ते राजकीय क्षेत्र असो, कॉर्पोरेट क्षेत्र असो किंवा अभिनयातील क्षेत्र असो. एक काळ असा होता ज्या वेळी पुरुष पात्रांना मध्यवर्ती धरून चित्रपटांच्या कथा लिहिल्या जायचा. मात्र काळ बदलत गेला तसा आता स्त्रीपात्र आला मध्यवर्ती धरून चित्रपटांच्या कहाण्या तयार होऊ लागल्या आहेत.

पूर्वी चित्रपटांमध्ये अभिनेत्रीही सुंदर, नाजूक, काटक अशाच लागायच्या. साउथ इंडस्ट्री असो किंवा बॉलीवुड इंडस्ट्री इथे सौंदर्य आणि फिटनेस ला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र सध्या अभिनेत्रींच्या व्याख्येत बदल होऊन आता वजनाने अधिक असलेल्या अभिनेत्रीसुद्धा प्रमुख भूमिका उत्तम रित्या वठवतात. आज या पोस्ट मार्फत आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे वजन अधिक असूनही त्या दिसायला फारच क्युट आहेत.

1. अनुष्का शेट्टी – अभिनेत्री अनुष्का शेट्टी ची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही कारण भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या बाहुबली या चित्रपटात अनुष्का शेट्टी ने काम केले होते. अनुष्का शेट्टी ही साउथ कडील एक नामांकित अभिनेत्री आहे. सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या अनुष्का शेट्टीचे वजन थोडे जास्त आहे मात्र याचा तिच्या अभिनयावर कोणताच फरक पडलेला जाणवत नाही. तिचे वजन ६५ किलो आहे.

2. काव्या माधवन – काव्या माधवन हे साउथ इंडस्ट्रीमधील एक नामांकित नाव आहे. काव्याही अभिनेत्री सोबतच एक गायिका सुद्धा आहे. काव्याने वयाच्या सातव्या वर्षी अभिनय करण्यास सुरुवात केली होती. काव्याचे वजन अधिक असून देखील ती दिसायला फारच सुंदर आहे.
3. भारती सिंह – भारताची लाफ्टर क्वीन म्हणून अभिनेत्री भारती सिंह जगप्रसिद्ध आहे. भारतीय ने इंडियन लाफ्टर चॅलेंज या रियालिटी शोमधून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने कॉमेडी सर्कस, महाबली कॉमेडी सर्कस, खतरा खतरा खतरा, कपिल शर्मा शो यांसारख्या अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केले. भारती सिंह ही उत्कृष्ट कॉमेडियन सोबतच एक उत्तम डान्सर ही आहे. भारती चे वजन ७८ किलो आहे.
4. अंजली आनंद – टीव्ही इंडस्ट्री मधील एक यशस्वी अभिनेत्री अंजली आनंद हिने ढाई किलो इश्क या टीव्ही मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पाऊल ठेवले होते. विशेष म्हणजे अंजलीने या मालिकेसाठी तिचे वजन १०८ किलोपर्यंत वाढवले होते. अंजलीने ढाई किलो प्रेम आणि कुल्फी कुमार बाजेवाला यांसारख्या सुपरहिट मालिकांमध्ये काम केले. अंजलीला टेलिव्हिजन विश्वातील सर्वात वजनदार अभिनेत्री म्हणून ओळखले जाते तिचे वजन ९२ किलो आहे.
5. अक्षरा नायक – ये रिश्ता क्या कहलाता है क्या सुपरहिट टेलिव्हिजन शोमध्ये अन्नया हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षरा नायक तिच्या खऱ्या आयुष्यात खूप वजनदार आहे. तिचे वजन ६३ किलो आहे.

6. रितिषा राठौर – टीव्ही इंडस्ट्री मधील वजनदार अभिनेत्रीं पैकी एक असलेली रितिषा राठौरचे वजन जाणून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. रितिषा ने बढो बहू, दील से दील तक, क्या कसूर है अमला का यांसारख्या लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. तिचे वजन ९४ किलोच्या आसपास आहे.
7. नित्या मेनन – साऊथ इंडस्ट्रीमधील अभिनेत्री नित्या मेनन ही एक कसलेली अभिनेत्री आहे.तिने तिच्या अभिनयामुळे फिल्म इंडस्ट्री मध्ये स्वतःची एक वेगळी जागा बनवली. नित्याचे वजन जरी जास्त असले तरीही तिचे सौंदर्य आणि अभिनयाला तोड नाही. नित्या लाखो हृदयांची धडकन असून तिच्या चाहात्यांची संख्या खूप जास्त आहे. नित्याने मिशन मंगल या चित्रपटात काम केले होते हा तिचा पहिला हिंदी चित्रपट आहे. याशिवाय नित्याने कन्नड, मल्याळम ,तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले. तिचे वजन ५८ किलो आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.