पार्टीचा मुड असला किंवा मुड खराब असला अथवा रोजची सवय म्हणून माणसे दारु पितात.दारुचे वेगवेगळे प्रकार असतात. ते एक उत्तेजक पेय आहे. दारु प्यायल्यावर एक वेगळ्याच प्रकारची नशा डोक्यात चढते. त्यामुळे काहीवेळेस एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्याचा भास होऊ लागतो.
दारु प्रमाणात प्यायल्यास त्याचे काही दुष्परिणाम होत नाही पण प्रमाणाबाहेर प्यायल्यास मात्र त्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात असे म्हटले जाते. माणसं सुरुवातीला अगदी मजा म्हणून दारु पिऊन बघतात. पण हळूहळू त्या मजेची सवय होऊन ते तिच्या आहारी जातात. त्यामुळे शारीरिक आजारपणासोबतच घरदार उद्धवस्त होणे, बिझनेस बुडणे, अपघात होणे अशा गोष्टी घडतात.
त्यामुळेच नक्की किती दारु प्यायली तर ती घातक ठरणार नाही असा प्रश्न प्रत्येक दारु पिणाऱ्या व्यक्तीला पडतोच. आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने (WHO) या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. या उत्तरातून त्यांनी मद्यप्रेमींना धोक्याचा इशाराही दिला आहे. दारु पिणे म्हणजे आतड्याचा कर्करोगाला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे WHOने म्हटले आहे.
लॅन्सेट (The Lancet Public Health) या जगभरातील आरोग्य विषयक संशोधन प्रकाशित करणाऱ्या नियतकालिकात दारु आणि कॅन्सरविषयीचं संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात त्यांनी अगदी किंचितशी दारुसुद्धा किती घातक असते किंवा कर्करोगाला आमंत्रण देते ते यात सांगितले आहे. या संशोधनानुसार दारुमुळे सात वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता सर्वाधिक असते. याचाच अर्थ कोणत्याही प्रमाणातील दारुही शरीरासाठी घातकच असते.
अनेकांना असे वाटते की दारु किंवा वाइनचा एक ग्लास घेतला तर काहीच होणार नाही. पण त्यांचा तो अंदाज पूर्णपणे चुकीचा आहे. दारुमुळे सर्वाधिक धोका पुरुषांमध्ये आतड्याच्या आणि महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचा असतो.
संशोधनानुसार, आठवड्याला दीड लीटरपेक्षा कमी वाईन साडेतीन लीटरपेक्षा कमी बीअर किंवा 450 मिलीपेक्षा कमी दारु पिणाऱ्यांना कॅन्सरचे निदान झाल्याचे समोर आले होते.
लॅन्सेटमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार दारु सेवन सुरु केल्यापासून कॅन्सर होण्याची शक्यता नेमकी कधी निर्माण होते, याचा नेमका पुरावा अजून तरी आस्तित्वात नाही. किंवा किती दारु पिणे योग्य याचा देखील शोध लागलेला नाही. म्हणजे आपल्या मते आपण कितीही प्रमाणा दारु पित असलो तरी ती एवढीशी दारुही शरीरासाठी अपायकारक असते. दारुचे आरोग्याला कोणतेच फायदे होत नाहीत.
दारु पिण्याचं कोणतं प्रमाण सुरक्षित आहे, असा दावा कुणी करु शकत नाही. कुणी किती दारु प्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न.. जितकी जास्त दारु पिता अर्थातच तितका कॅन्सरचा धोका जास्त.. म्हणजेच तुम्ही जितकी कमी दारु प्याल तितकं ते आरोग्यास चागलं असे दारु आणि अन्य अपायकारक अंमली पदार्थ विषयक तज्ञ आणि बिगर संसर्गजन्य रोगाच्या तज्ञ डॉ कॅरीना फरेरा बोर्जेस यांनी सांगितले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !