Headlines

कॅन्सर उपचारामध्ये आता किमोथेरपीची गरज नाही, संशोधकांनी केला दावा, वाचा !

मरण यायचेच असेल तर ते लगेच यावे उगीच तडफडत येऊ नये असे म्हणतात. त्यातच कॅन्सरसारखा अतिभयंकर आजार तर कोणालाच होऊ नये. कारण जसा हा आजार भयंकर तसाच त्यावरील उपचार देखील अतिभयंकर असतात. कॅन्सरसारखा भयंकर रोग बरा होण्यासाठी अजुनतरी कोणतीही औषधे निघालेली नाही. त्यासाठी केमो थेअरपीसारखे कठीण आणि महागडे उपचारच लागतात. पण त्यातही एवढे सगळे केल्यावर तो रुग्ण त्यातून बरा होईलच याची शास्वती नाही.

पण आता या आजारावर नवा उपचार निघाला असून विशेष म्हणजे त्यासाठी केमो सारख्या थिअरपीचीसुद्धा गरज नाही लागणार असा दावा अमेरिका आणि भारताच्या शास्त्राज्ञांनी मिळून केला आहे.यामध्ये अमेरिकेतल्या क्लिव्हलॅण्ड क्लिनिकमधले ११ शास्त्रज्ञ आणि भारतातल्या अलाहबाद विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची टीम सहभागी आहे.

या शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगानुसार कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी आता केमो थेरपीची गरज भासणार नाही. तसेच उपचारासाठी कोणत्याही प्रकारची रेडीएशन लागणार नाहीत. त्यामुळे उपचारांदरम्यान होणारे शरीरावरील दुष्पपरिणाम कमी होतील. गेले वर्षभर हा प्रकार अमेरिकेत उंदरांवर यशस्वीरित्या केला जात आहे. उंदरांवर प्रयोग यशस्वी झाला याचा अर्थ माणसावर देखील तो यशस्वी होईल अशी आशा शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

कॅन्सरच्या रुग्णांवर केमो थेअरपी चालू असताना त्यात ट्युमर नष्ट करण्यात येत असतो पण त्याचवेळी कॅन्सरच्या पेशींसोबतच शरीराला आवश्यक असणाऱ्या पेशींनाही धक्का बसतो. त्याचा शरीरात विपरीत परिणाम होतो. यासाठी शास्त्रज्ञांनी मिथाईलग्लॉक्सलही नवी पद्धत शोधली आहे. या पद्धतीत रेडीएशनचा वापर केला जाणार नसल्यामुळे पेशंट वाचण्याचे आणि त्यांचे आयुष्य वाढण्याचे चान्सेस वाढले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !