Headlines

सचिन आणि सीमा यांना मिळाली नोकरीची ऑफर, पॅकेज इतकं मिळाला आहे की जाणून व्हाल थक्क !

गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांवर सचिन आणि सीमा यांच्या प्रेम कथेची चर्चा केली जात आहे. सीमा आणि सचिन हे एकमेकांना कसे भेटले? सचिन आणि सीमा यांचा दिवसाचा नित्यक्रम काय आहे तसेच यांचे प्रेम गेल्या किती दिवसापासून होते त्यांच्या स्टोरीज आपण ऐकत आहोत आणि पाहतच आहोत परंतु हे प्रकरण काही थांबायचे नाव घेत नाही आहे. नुकतीच एक माहिती देखील मिळाली आहे की लवकरच सीमा आणि सचिन यांना नोकरी मिळणार आहे आणि या नोकरीतला पगार हा इतका आहे की हा आकडा ऐकून तुम्हाला देखील नवलच वाटेल.

गुजरात मधील एका व्यवसायिकाने सचिन आणि सीमा हैदर यांना नोकरीची ऑफर दिलेली आहे. दोघांना सहा सहा लाख रुपयाचे पॅकेज देखील जाहीर केले आहे.

गुजरात मधील एका व्यवसायिकांनी एका चिठ्ठीच्या द्वारे नोकरीचा प्रस्ताव दोघांना पाठवलेला आहे, यापूर्वी सचिन आणि सीमा यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी देण्यात येईल असा प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता त्याचबरोबर सचिन आणि सीमा हे दोघेही सध्या आर्थिक संकटांना सामोरे जात आहे अशी माहिती देखील माध्यमांमध्ये दाखवली गेली होती. त्यानंतर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऑफर सीमा आणि सचिन यांना मिळत आहेत.

सीमा आणि सचिन यांना तीन पानाची एक चिठ्ठी मिळालेली आहे. या चिठ्ठी मध्ये सीमा व सचिन यांना दर महिना पन्नास हजार रुपये प्रमाणे नोकरी दिली जाईल. या अनुषंगाने वर्षाला त्यांना सहा लाख पॅकेज असेल असे देखील म्हटले गेले आहे.

सीमा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वेगवेगळ्या कृतीमुळे चर्चेत आलेली आहे. आपल्या चार मुलांना पाकिस्तानला सोडून नेपाळ मार्गे भारतात सीमा आली होती आणि त्यानंतर सोशल मीडियावर सीमाचे अनेक व्हिडिओज आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहेत. सीमा आणि सचिन यांची प्रेम कथा रंगवून सांगितली जात आहे.

पुढील अनेक दिवस आपल्याला या दोघांची प्रेम कथा पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही परंतु या दोघांवर तयार झालेले व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र धुमाकूळ घालत आहेत. सीमा आणि सचिन यांचा चाहता वर्ग देखील निर्माण झालेला आहे

तसेच सीमा गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय गुप्तचर विभागाच्या चर्चेला देखील सामोरे जात आहेत तसेच शेजारच्या राष्ट्राने तिला आपल्याकडे गुप्तहेर म्हणून देखील पाठवले नाही ना. याची शंका म्हणून तिच्यावर नजर देखील ठेवली जात आहे, अशा प्रकारच्या बातम्या देखील माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहे. जर तुम्ही देखील सीमा आणि सचिन यांच्या बातम्या व वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहिल्या नसतील तर एकदा अवश्य पहा.