Headlines

गरिबांचे कारचे स्वप्न लवकरच होईल पूर्ण, टाटाची जबरदस्त फिचर्सची नॅनो इलेक्ट्रिक गाडी आली बाजारात !

भारतीय ऑटोमोबाईल बाजारामध्ये सध्या इलेक्ट्रॉनिक गाड्या यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कंपनी देखील आपल्या स्टॉक मध्ये इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक गाड्यांची भरती करत आहेत त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या कंपनी सध्या मार्केटमध्ये उतरलेले आहेत. या गाड्याच्या किंमती देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरतात.

पूर्वीच्या काळी गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यावर गाड्यांचे लोकांबरोबर एक वेगळे नाते असायचे परंतु आता काळ बदललेला आहे. स्पर्धेच्या वातावरणात प्रत्येक ब्रँड स्वतःला सिद्ध करण्यासाठी मार्केटमध्ये नवीन नवीन प्रॉडक्ट आणत आहे, अशावेळी ग्राहकांकडे देखील वेगवेगळ्या पर्यायांची यादी निर्माण झालेली आहे.

एकीकडे पेट्रोल, डिझेल यांची किंमत गगणा ला भिडत आहे, अशावेळी कमी किंमतीमध्ये गाड्या खरेदी करणे ग्राहकांसाठी संकट ठरले आहे. या सर्वातून पर्याय काढण्यासाठी अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक गाड्यांची निर्मिती केलेली आहे. या इलेक्ट्रॉनिक गाड्यांना ग्राहकांची पसंती देखील मोठ्या प्रमाणावर मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच टाटा कंपनीने नॅनो ही गाडी लॉन्च केली होती. ती गाडी खूपच स्वस्त कार मानले जायची त्याच बरोबर हा प्रोजेक्ट रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट देखील मानला गेला होता. आता हीच टाटा नॅनो आता आपल्याला नवीन इलेक्ट्रिक अवतारामध्ये पाहायला मिळणार आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार टाटा मोटर्स 2023 मध्ये टाटा नॅनो चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करणार आहे, यामुळे ग्राहकांना आता नवीन पर्याय देखील उपलब्ध होणार आहे अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

भारतीय बाजारांमध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनाची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे, अशावेळी सगळ्या वाहन कंपनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती देखील करत आहे अशातच टाटा मोटर्सने टाटा नॅनो टीव्ही बद्दल घोषणा जाहीर केलेली आहे. अनेकांचे असे देखील म्हणणे आहे की इलेक्ट्रिक नॅनो 72 वी पावर पॅक देऊ शकते त्याचबरोबर जास्तीत जास्त स्पीड म्हणजेच 60-70 किलोमीटर प्रतितास वेगाने रस्त्यावर धावेल.

फुल चार्जिंग मध्ये तीनशे किलोमीटर पर्यंत अंतर ही गाडी आरामात पार करू शकते. या गाडीमध्ये तुम्हाला तीन वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देखील मिळणार आहे. ते मोड इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड असतील. इलेक्ट्रिक नॅनो मध्ये 7 इंच चे टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लूटूथ आणि इंटरनेट कनेक्टिविटी, 6 स्पीकर साउंड सिस्टम, पावर स्टीयरिंग, पावर विंडो, एबीडी सारखे फीचर्स मिळतील. टाटा मोटरने या इलेक्ट्रिक कार बद्दल किंमत बद्दल अजून ऑफिशियल घोषणा जरी केली नसली तरी अंदाजानुसार या इलेक्ट्रिक कारची किंमत 3 ते 5 लाख रुपये एवढी असू शकते.