Headlines

इंदूरमध्ये अनुष्का शर्माने घालवले बालपण, एकेकाळी वडिलांचे चालवायची स्कूटर सोशल मीडियावर झाले लहानपणी चे फोटो व्हायरल !

मित्रांनो हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर एखादी घटना सेकंदामध्ये व्हायरल होते. अनेक लोकांपर्यंत फोटोज व्हिडिओ पोहोचतात आणि हजारो लोक लाईक कमेंट आणि शेअर देखील करतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. तुम्हा सर्वांना अनुष्का शर्मा माहिती आहे. अनुष्का शर्मा ने आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका केली आहे.

“रब ने बना दी जोडी” या चित्रपटाच्या माध्यमातून तिने आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली त्यानंतर तिला मागे वळून पाहायला लागले नाही. आज ती यशाच्या शिखरावर पोचलेली आहे. क्रिकेटर विराट कोहली सोबत लग्न झाल्यानंतर तिला एक मुलगी देखील आहे परंतु आज आम्ही तुम्हाला अनुष्का शर्माच्या लहानपणाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत, यामुळे पुन्हा एकदा अनुष्का शर्मा तिच्या बालपणीच्या आठवणी ताज्या करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा इंदूर आली होती. या इंदूरमध्ये आल्यानंतर तिने आपल्या पती समावेत महाकाल बाबांचे दर्शन देखील घेतले. महाकाल यांची पूजा देखील केली. अनुष्का शर्मा व विराट कोहली यांनी महाकाल भस्म आरती देखील केली होती, त्यानंतर नंदी सभागृहामध्ये थोडा वेळ व्यतीत केला होता. आरती आटोपल्यानंतर हे दोघेही अनुष्का शर्माच्या घरी गेले इंदूरमध्ये एकेकाळी अनुष्का शर्मा ज्या ठिकाणी राहायची, त्या ठिकाणी तिचे बालपण गेलेले होते.अशा ठिकाणी या दोघांनी काही वेळ आराम देखील केला.

अनुष्का शर्माची बालपण इंदूरमधील महू या ठिकाणी गेले. अनुष्का शर्माचे वडील एकेकाळी सैन्यात कर्नल होते म्हणूनच अनुष्का शर्माचे बालपण देशातील विविध ठिकाणी गेले,असे म्हणायला हरकत नाही. विविध ठिकाणी अनुष्काने आपले बालपण घालवले आहे. तेथील आठवण यासोबत नेल्या आहेत. अनुष्काचे कुटुंब एकेकाळी इंदूर मधील महू ठिकाणी राहायचे. तेथे मोठ्या प्रमाणावर आर्मी एरिया आहे.

या आर्मी एरियात सैन्यातील लोक राहतात. याच ठिकाणी अनुष्का आपल्या पतीसोबत आली होती. या ठिकाणी आल्यावर अनुष्काने जुन्या आठवणी नव्याने ताज्या केलेल्या आहेत तसेच लहानपणीचे काही फोटोज घराचे फोटो वडिलांसोबत घालवलेले क्षण इत्यादी फोटो अनुष्का शर्मा आणि सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत. हे फोटो अपलोड करतात अनेकांनी या फोटोवर लाईक कमेंट वर्षाव केलेला आहे शाळेतील गणवेश यामध्ये असलेला फोटो कौतुकाचा विषय देखील ठरत आहे. अनेक जण या फोटोवर छान कमेंट देखील करत आहेत.