Headlines

धक्कादायक : फक्त या कारणामुळे लोकप्रिय खलनायक आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60व्या वर्षी केला विवाह !

बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये अनेक अशा नवीन नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात या इंडस्ट्री मधील अभिनेता अभिनेत्री यांचे चर्चा तर रोजच होत असते परंतु यामागे खलनायक देखील मागे नाहीत हल्ली एक चर्चा रंगत आहे आणि या चर्चेमागील कारण देखील तसेच आहे तुम्हा सर्वांना आशिष विद्यार्थी माहिती आहेत अशीच विद्यार्थी यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केलेली आहे.

आशिष हे बॉलीवूड इंडस्ट्री साउथ इंडियन इंडस्ट्री यामध्ये स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण केलेले एक अभिनेता आहेत. त्यांनी आतापर्यंत जितक्या भूमिका केलेल्या आहेत, त्या सर्व भूमिका प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलेल्या आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेता खलनायक आशिष यांनी वयाच्या साठाव्या वर्षी लग्न केलेले आहे आणि म्हणूनच तरुण मंडळींसाठी नक्कीच आशिष प्रेरणादायी ठरतील यात कोणती शंका नाही.

अभिनेता खलनायक आशिष विद्यार्थी यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झालेले आहेत. प्रत्येक जण त्यांना नवीन विवाहासाठी शुभेच्छा देखील देत आहेत. आशिष विद्यार्थी यांच्या पत्नीने लग्नाच्या वेळी पांढऱ्या रंगाची मेखल परिधान केले होते तर साठ वर्षीय आशिष यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि सोनेरी मुंडू परिधान केलेले होते. या कपड्यांमध्ये दोघेही अतिशय सुंदर दिसत होते.

आशिष विद्यार्थी आपल्या चित्रपट करिअर शिवाय आपल्या व्यक्तिगत जीवनामुळे देखील अनेकदा प्रसिद्ध झालेले होते, त्याचबरोबर अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे चर्चेमध्ये देखील त्यांचे नाव आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते.
हिंदी चित्रपटातील खलनायक आशिष विद्यार्थिनी कोलकत्त्यामध्ये वयाच्या साठ्यावर्षी पद्धतीने आसामची रूपाली बरोबर लग्न केले. यांच्या लग्नामध्ये जवळच्या नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले होते.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आशिष यांच्या पहिल्या पत्नीचे आडनाव आणि दुसऱ्या पत्नीचे आडनाव सेम टू सेम आहे. आशिष यांच्या पहिल्या पत्नीचे नाव राजेश्री बरुआ आहे राजश्री अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी आहे.
राजश्री आणि आशिष विद्यार्थी यांचा एक मुलगा देखील आहे त्याचे नाव अर्थ विद्यार्थी आहे.

आशिष यांचे दुसऱ्या पत्नी बद्दल बोलायचे झाल्यास रूपाली पेशाने फॅशन डिझाईनर आहे. रूपाली कोलकत्ता मध्ये स्वतःचे फॅशन स्टोअर देखील चालवते. सुरुवातीला या दोघांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले त्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये एकमेकांसोबत लग्न केले. दोघांनी कोर्टामध्ये लग्न केल्यानंतर संध्याकाळी जवळच्या नातेवाईकांसाठी एक पार्टी देखील ठेवली.

ज्येष्ठ अभिनेते म्हणाले, “मला एक ठाम विश्वास होता की मला लग्न करायचे आहे कारण मला कुणासोबत तरी प्रवास करायचा आहे. तर, मी शब्दशः विश्वात शब्द बाहेर काढतो. मी त्या वेळी ५५ वर्षांचा होतो आणि मी म्हणालो की मला कोणाशीतरी लग्न करायचे आहे. आणि अशीच माझी रुपाली बरुआशी भेट झाली. माध्यमांच्या प्रतिनिधीनि दोघांच्या प्रेम कथेबद्दल प्रश्न विचारल्यावर आशिष यांनी उत्तर देण्याचे टाळले आणि नंतर कधीतरी निवांत मध्ये स्टोरी सांगेन असे देखील म्हटले.