Headlines

प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांचे फोटो सोशल मीडियावर होत आहे व्हायरल, सुंदर फोटो पाहून चहाते म्हणाले की…!

हल्ली सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक प्रत्येक जण सोशल मीडियावर आपला वेळ घालवत असतो. सोशल मीडियाचा वापर आपण भजन कीर्तने अभंग ऐकण्यासाठी देखील करत असतो. या सर्व मंडळींचा आपल्याला वावर मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर दिसून येतो. कीर्तनकार, मोटिवेशनल स्पीकर यांचे रील आपण अनेकदा पाहत असतो आणि त्यांना फॉलो करत असतो.

आपल्या सर्वांना कथाकार जया किशोरी माहितीच असेल. भजन, कीर्तन यामुळे जया किशोरी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. आपल्या भजन आणि कीर्तनामुळे चर्चेत असणाऱ्या जया किशोरी पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत. परंतु यंदा चर्चेचे कारण मात्र वेगळे आहे, हे कारण आहे जया किशोरी यांच्या लग्नाचे.

जया किशोरी भागवत मध्य प्रदेश येथील नगडा येथे महापुराण कथा सांगण्यास गेल्या होत्या. माध्यमाच्या प्रतिनिधीशी गप्पा मारताना जया किशोरी म्हणाले की, जर जीवनसाथी हा साथ देणारा असेल तर जीवनातील एकटेपणा सहजच दूर होतो. हे विधान ऐकल्यानंतर लोक आता जया किशोरी यांच्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या पार्टनर बद्दल तर्कवितर्क लावताना आपल्याला दिसत आहेत.

प्रत्येकाच्या ओठी जया किशोरी यांच्या लग्नाबद्दलची चर्चा ऐकायला मिळत आहे. जया किशोरी यांचे वय 27 वर्ष आहे लग्नाबद्दल प्रश्न विचारताच जया किशोरी म्हणाल्या की, मला कोलकत्ता मध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी लग्न करायचे आहे.

जया किशोरी यांना आपल्या आई-वडिलांपासून वेगळे नाही व्हायचे, त्यांचे म्हणणे आहे की लग्नानंतर मुलीला आपल्या आई-वडिलांपासून दूर जावे लागते म्हणूनच जयाला आपल्या शहरातच राहून आपल्या आई वडिलांजवळ राहायचे आहे आणि या शहरातील युवक लग्नासाठी पाहायचा आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांचे फोटो देखील वायरल झालेले आहे. या फोटोमध्ये जया किशोरी खूपच सुंदर दिसत आहेत. जणू काही जया किशोरी लग्नासाठी तयारी करत आहे की काय असे अनेक प्रश्न त्यांच्या फॉलोवरच्या मनात येत आहेत. जर तुम्ही देखील जया किशोरी यांचे फोटो पाहिले नसतील तर त्यांच्या ऑफिशियल अकाउंट वर अवश्य पाहू शकता.