Headlines

जास्त दूध प्यायल्याने होते हे नुकसान, जाणून घ्या एका दिवसात किती दूध प्यावे !

दूध हे सर्वगुणसंपन्न असते हे आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते. दुधामध्ये कॅल्शियम, विटामिन बी १२, प्रोटीन, भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि फॉस्फरस असते. यामुळेच लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच कोणत्याही स्वरूपात दूध प्यावे असा सल्ला नेहमीच दिला जातो.

वजन कमी करण्यासाठी, हाडे मजबूत बनण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी दुधाचा उपयोग होतो हे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का की एवढे सगळे गुण असून देखील दूध आपल्या शरीरास हानिकारक ठरू शकते. जास्त दुधाचे सेवन केल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

आपल्या आरोग्यासाठी दूध फायदेशीर असते हे आपल्या मनावर आधीपासूनच बिंबवले असल्यामुळे या गोष्टीवर तुमचा पटकन विश्वास बसणार नाही मात्र कोणत्याही गोष्टीचे अति प्रमाणात सेवन केल्यास ते हानीकारक ठरू शकते हे वाक्य दुधासाठी देखील लागू होते.
काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की अधिक मात्रेत दूध प्यायल्याने आरोग्य विषयी समस्यांसोबतच कॅन्सर होऊ शकतो. चला तर जाणून घेऊ अधिक दूध प्यायल्यामुळे कोण कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते.

पचना संबंधी समस्या – दूध प्यायल्यामुळे पोट भरते. एवढेच नव्हे तर कित्येकदा जास्त दूध प्यायल्यामुळे पोट फुगल्यासारखे जाणवते. त्यामुळे पोटात सतत मळमळल्यासारखे होते. दूध पचायला जड असल्यामुळे पचना संबंधी अनेक समस्या उद्भवतात.

दूध शरीराला सुस्त बनवते – जर दूध तुमच्या शरीरास पोषक ठरत नसेल तर तुम्हाला लीकी-गट सिंड्रोम होऊ शकतो. यामध्ये थकवा आणि सुस्ती ची लक्षणे दिसतात. दुधामध्ये ए१ कैसिइन चे घटक आढळतात. त्यामुळे कधीकधी सुस्ती सोबतच शरीरातील बॅक्टेरिया वाढतात. म्हणूनच ज्या व्यक्तींना दुधाची ऍलर्जी असते त्यांना ए२ मिल्क वेरिएंट वापरण्याचा सल्ला दिला जातो.

त्वचेवर ब्रेक आऊट – दुधाच्या अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर ऍलर्जी किंवा ब्रेकआउट येऊ शकतात. जर तुमच्या त्वचेवर लाल डाग किंवा चट्टे दिसत असतील तर तुमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे. त्वचेवर ब्रेक आऊट चे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक दिसून येते.

हाडे कमजोर बनवते – सामान्यतः हाडे मजबूत करण्यासाठी दूध महत्त्वाचे असते असे म्हटले जाते. मात्र योग्य मात्रे पेक्षा अधिक दूध प्यायल्याने ते हानिकारक ठरू शकते.
२०१४ मध्ये बीएमजे मध्ये केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले की अधिक दूध सेवन करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या तुलनेत कमी दूध सेवन करणाऱ्या स्त्री-पुरुषांची हाडे मजबूत होती व त्यांना कमी सुस्ती यायची.

मस्तिष्क संबंधी समस्या – अधिक दूधाचे सेवन केल्यामुळे मस्तिष्क संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यांमध्ये स्मृति कमी होणे, सतत एखादी गोष्ट विसरणे, एकाग्रता कमी होणे यांसारखी लक्षणे आढळतात.

हृदयासंबंधी विकार – बीएमजे ने केलेल्या संशोधनानुसार एका दिवसात अधिक दूध पिणाऱ्या पुरुषांमध्ये हृदयासंबंधी काही समस्या दिसून आल्या. तर अधिक दूध पिणाऱ्या महिलांमध्ये कॅन्सरची लक्षणे दिसून आली. आम्ही तुम्हाला दुधाचे फायदे व अधिक दूध प्यायल्यामुळे होणारे तोटे सांगितले आहेत.
आता एका दिवसात किती दुधाचे सेवन करावे हे सांगणार आहोत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात एक ते दोन ग्लास दूध प्यावे. तुम्ही पनीर, ताक, दही या स्वरूपात देखील दूध घेऊ शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !