Headlines

पाण्यात मिसळून फक्त या ४ गोष्टी घ्या, इम्युनिटी होईल स्ट्रॉंग आणि वजन होईल झपाट्यात कमी !

रोजच्या धावपळीच्या व्यस्त वेळापत्रकात स्वत:ची निगा राखायला योग्य वेळ मिळत नाही. वेळ नसल्यामुळे आपण अनेक शॉर्टकट मार्ग अवलंबतो. म्हणजे अगदी खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रिजर्रवेटीव्ह पॅकेजेसवाले पदार्थ किंवा कोणतेही झटपट तयार होणारे चमचमीत पदार्थ तयार करण्याकडे सर्वांचा कल असतो.

वेळ नसल्यामुळे व्यायामाकडे देखील दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत या सर्व गोष्टींचा शरीरावर तथा तब्येतीवर भरपूर फरक पडतो. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होतेच शिवाय सतत जंक फुडच्या सेवनामुळे वजन देखील वाढते.

सध्या कोरोनाच्या काळात सर्वानी तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. या काळात शरीरातील प्रत्येक अवयावाची निगा राखावी लागते. त्यांच्या सर्व क्रिया नीट होत आहेत की नाही या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. जर शरीरातील अवयव योग्यरित्या कार्यरत नसतील तर वेगवेगळे आजारपण ओढावले जावू शकते.

या सर्व प्रकारांपासुन वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करण्यास तुम्हाला जास्त कष्ट देखील घ्यावे लागणार नाहीत शिवाय खुप कमी पैशांत तुमचे काम होईल. या काही गोष्टी पाण्यात मिसळुन त्याचे तुम्हाला सेवन करायचे आहे.

कढीपत्त्याचे पाणी – सकाळी उपाशी पोटी कढीपत्त्याचे पाणी प्यायल्यास मेटाबोलिज्म वाढते आणि वजन कमी होते. याशिवाय या पाण्यामुळे शरीरातील सर्व विषारी घटक नष्ट होतात. यामुळे शरीराला संपुर्ण दिवसाची उर्जा मिळते. जर तुम्हाला पचनासंबंधी समस्या असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करुन पहा. हे पाणी तुमच्या त्वचेला फ्रि रेडीकल्स सोबत लढण्यास मदत करते. हे पाणी तयार करण्यासाठी रात्री एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या त्यात काही कढीपत्त्याची पाने टाका. हे पाणी सकाळी उपाशी पोटी प्या.

लिंबू पाणी – सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जर लिंबू पाणी प्यायल्यास तुम्हाला संपुर्ण दिवसभर तरतरी जाणवेल. नियमित लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. लिंबू पाण्यात विटामिन आणि पोटॅशियमचे गुण असतात.

यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय लिंबू पाण्यामुळे शरीरातील मेटाबोलिज्म वाढते. तसेच त्यामुळे तुमच्या शरीरातील अनावश्यक चरबी वितळते. लिंबामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे चेहऱ्यावर तेज येण्यास मदत होते.

वेलचीचे पाणी – वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यास फेशिअल फॅट कमी होते. वेलचीमध्ये अनेक एंटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात. यामुळे तोंडातील बॅक्टेरियांचा नाश होतो. यामुळे तोंडातील दुर्गंधी, श्वासामार्फत येणारा दुर्गंध, हिरड्यांमधील सुज या सर्व त्रासांपासुन सुटका होते. शरीरात रेड ब्लड सेल्स तयार करण्यात महत्वाची भुमिका पार पाडते.

तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. वेलचीच्या पाण्यामुळे पाचन संस्था मजबुत होते. यामुळे पोटातील सुज कमी होते, छातीतील जळजळ बंद होते. जर तुम्हाला सुद्धा पचनासंबधी त्रास होत असेल तर वेलचीचे पाणी नक्की प्या.

बडीशेपचे पाणी – बडीशेपमध्ये कॅल्शियम, सोडीयम, लोह आणि पोट‌ॅशियमचे गुणधर्म असतात. शरीर तंदूरस्त राखण्यासाठी हे गुणधर्म महत्वाचे असतात. याचा वापर औषध म्हणुन सुद्धा अनेक आजारांवर केला जातो. बडीशेपमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, लोह, पोटॅशियम, विटामिन ए व सी, फायबर, यांसारखे गुणधर्म असतात. याशिवाय यात एंटीऑक्सीडेंट आणि एंटीसेप्टीक हे देखील गुणधर्म असतात.

हे गुणधर्म वात-पित्त, कफ यांसारखे आजार संतुलित राखण्यास मदत होते. रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी प्यायल्यास र’क्त शुद्ध होते. तसेच डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास मदत होते. एसिडीटी होत नाही. हाय ब्ल’ड’प्रेशर आणि कोलेस्ट्रोल कमी होते. सुज कमी करण्यास देखील बडीशेप वापरली जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !