Headlines

अंगारकी, संकष्टी चतुर्थी दिवशी करा हे उपाय, पैश्याचा ढीग लागेल घरात, सर्व अडचणी होतील दूर !

आराध्य दैवत म्हणून हिं*दू ध*र्मा*त गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. भाद्रपद‌ महिन्यात गणपतींचे आगमन घरोघरी होते‌. या दिवसात गणपतीची पूजाअर्चा करतात. परंतु अनंत चतुर्दशी होऊन गेल्यास दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणपती चा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक जण उपवास व्रतवैकल्य करतात. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केल्यास व देवाला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखवल्यास गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न राहतो.

हिं*दू ध*र्मा*त मंगळवार गणपती चा दिवस मानला जातो. गणपतीला बुद्धी आणि शुभतेचे दैवत मानले जाते. भक्तांच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणी गणपतीच्या नामस्मरणाने दूर होतात. त्यामुळेच गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हटले जाते. कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी गणपतीची पूजा करतात. असे म्हटले जाते की कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी गणपतीची पूजा केल्यास त्या कामात कधीही विघ्न येत नाही.

गणपती जेथे विराजमान होतात तेथे त्याच्या सोबत त्याच्या पत्नी रिद्धी सिद्धी आणि पुत्र शुभ आणि लाभ विराजमान झालेले असतात. ते भक्तांवर संकट प्रयोग दोष आणि दारिद्र्य दूर करतात. जर तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाची अशुभ स्थिती असेल तर या दिवशी पुजा केली असती शांत होते. गणपती सोबतच देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. खरे तर जेथे बुद्धी असते तेथेच लक्ष्मी येते. गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार काही उपाय सांगितले आहेत. या उपायांना केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. चला तर जाणून घेऊ गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचे काही उपाय.

मंगळवारी किंवा संकष्टीच्या दिवशी गणपति अथर्वशीर्ष म्हटल्यास गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतो. मंगळवारी सकाळी किंवा संकष्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यावर अथर्वशीर्ष वाचावे. असे केल्यास आपल्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतील. कारण गणपतीला अथर्वशीर्ष खूप प्रिय आहे. अथर्वशीर्ष यामुळे आपल्या मनाला मानसिक शांती मिळते. जर तुमच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी असतील तर अथर्वशीर्षाचा पाठ जरूर वाचावा.

मंगळवारी किंवा संकष्टीच्या दिवशी सव्वा किलो मुगडाळ उकडून त्यात तूप आणि साखर घालून गाईला खायला द्या. असे केल्यास कर्जा संबंधित त्रास दूर होईल. लक्षात ठेवा हा उपाय सातत्याने करा. हा उपाय जोपर्यंत तुमचे कर्ज फिटत नाही तोपर्यंत करावा. गणपतीला दुर्वा आणि मोदक भरपूर प्रिय असतात त्यामुळे दुर्वा आणि मोदक किंवा बुंदीचे लाडू गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून अर्पण करावा. दुर्वा अमृतासमान गुणकारी असतात. जर काही कारणास्तव तुम्ही गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवू शकत नसाल तर लाडू देखील नैवेद्य म्हणून दाखवू शकता. यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर सहज प्रसन्न होईल.

मंगळवारी गणपतीच्या देवळात गणपती अकरा किंवा एकवीस दुर्वा वाहा. असे केल्यास तुम्हाला लवकरच चांगले फळ मिळेल. गणपतीला शेंदूर लावा. हनुमान सोबतच गणपतीचा देखील शृंगार शेंदूर लावून करतात. त्यामुळे आपल्यावरील अडचणी दूर होतात. जर तुमच्या कुंडलीतील बुध ग्रह अशुभ असेल तर बुधवारच्या दिवशी कोणत्याही गरीबास किंवा मंदिरात हिरवे मूग दान करावेत अशामुळे तुमच्या कुंडलीतील बुध ग्रह शांत होईल.

तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वर असेल. भरपूर उपाय करून देखील त्याचा काहीही फायदा होत नसल्यास मंगळवारच्या दिवशी घरात पांढऱ्या रंगाची गणेशाची मूर्ती स्थापित करावी. असे केल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल सोबतच तुमच्या घरावर कोणत्याही नकारात्मक शक्तिचा प्रभाव होणार नाही. जर तुम्हाला पैशांचा संबंधी कोणतीही अडचण असेल आणि भरपूर मेहनत घेऊन देखील तुम्हाला धनलाभ होत नसेल तर गणपतीची विधिवत पूजा करा आणि त्यास गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवा. काही वेळाने तोच नैवैद्य गाईला खाऊ घाला. याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.

टीप – पुराणांविषयी दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून पुराणांच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्यालयाला जुन्या पुराणांविषयी माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञ मंडळींना भेटावे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.