Headlines

काय आहे अक्षय तृतीयेचे महत्व आणि आजोबा, पणजोबा जेवायला येतात म्हणजे नक्की काय, जाणून घ्या !

आपल्याकडे एखादे शुभ कार्य करायचे असेल तर त्यासाठी आधी मुहुर्त शोधला जातो. आणि मुहुर्त म्हटलं कि साडे तीन मुहुर्तांवर डोळे झाकुन विश्वास ठेवला जातो. हिंदु धर्मात दसरा, गुढी पाढवा, अक्षय तृतीया आणि दिवाळीतील पाडवा या तीन मुहुर्तांना विशेष महत्व आहे. आज त्यातीलच एक मुहुर्त म्हणजे अक्षय तृतीया आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिसऱ्या तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते.

अक्षय तृतीयेला एखादे शुभ कार्य करायचे असल्यास कोणतेही पंचांग पहावे लागत नाही. या दिवशी केल्या गेलेल्या कार्यांना भविष्यात चांगले फळच मिळते. या वर्षी अक्षय तृतीयेला शनि त्याची चाल बदलणार असल्यामुळे त्याचा प्रभाव सर्व राशींवर पुढील सहा महिने होणार आहे. ही तिथी खुप पुण्यदायी असल्याचे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी केल्या गेलेल्या पुण्य कार्यांचे फळ हे अक्षय म्हणजेच अनेक जन्मांपर्यंत मिळणारे असते.

का साजरी केली जाते अक्षय तृतीया – हिंदु धर्मात अक्षय तृतीयेसंबंधीत अनेक मान्यता आहेत.
1. भगवान विष्णुंचा सहावा अवतार म्हणजेच भगवान परशुरामांचा जन्म या दिवशी झाला होता. त्यांनी महर्षि जमदाग्नि आणि माता रेनुकादेवीच्या घरात जन्म घेतला. त्यामुळेच या दिवशी भगवान विष्णुंची उपासना केली जाते. तसेच या दिवशी भगवान परशुरामांची सुद्धा पुजा करावी असे म्हटले आहे.
2. या दिवशी गंगा माता स्वर्गातुन धरतीवर अवतरली होती. असे म्हटले जाते की गंगेला धरतीवर बोलवण्यासाठी भगीरथ राजाने हजोरो वर्षे तप केला होता. त्यामुळे या दिवशी पवित्र गंगेत डुबकी मारल्यास सर्व पाप नष्ठ होतात.

3. हा दिवस म्हणजे अन्नपुर्ण मातेचा सुद्धा जन्म दिवस असतो. या दिवशी गरीबांना भोजन दिले जाते. अन्नपुर्णा देवीची पुजा करुन स्वंयपाक घरात जेवण बनवले जाते. 4.अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर महर्षि वेदव्यास यांनी महाभारत लिहीण्यास सुरुवात केली होती. महाभारताला ५ वा वेद मानले जाते. यातच श्रीमद्भागवत गीतेचा सुद्धा सहभाग असतो. या दिवशी श्रीमद्भागवत गीतेतील १८ वा पाठ वाचावा.

5. बंगालमध्ये या दिवशी गणपती आणि देवी लक्ष्मीची पुजा करुन व्यापारी मंडळी त्याच्या हिसाब किताबाला सुरुवात करतात. तिथे या दिवसाला हलखता असे म्हटले जाते. 6. या दिवशी शंकराने कुबेराला देवी लक्ष्मीची पुजा करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच या दिवशी लक्ष्मी देवीची पुजा करण्याची प्रथा रुढ झाली.

7. अक्षय तृतीयेच्याच दिवशी पांडव पुत्र युद्धष्ठिरला अक्षय पात्राची प्राप्ती झाली होती. या पात्राचे वैशिष्ठ्य म्हणजे त्या पात्रातील भोजन कधीच संपत नाही.

काय आहे अक्षय तृतीयेचे महत्व – या दिवशी कोणते ही शुभ कार्य केली जातात. या दिवशी कोणत्याही एका गरीबाला घरी बोलवुन त्याला सन्मानाने जेवु घालावे. किंवा आपल्या पाहुण्याला जेवायला घालावे यामुळे घरातील पितृ दोष निघून जातो आणि शांती लाभते. याच गोष्टीला आपण पित्र जेवायला घालणे अस्सं म्हणतो. या दिवशी पुरण पोळीचा गोड स्वयंपाक केला जातो. अशी आख्यायिका आहे कि ते जेवण करण्यासाठी आपले पूर्वज येतात आणि त्या पित्र रूपात खाऊन जातात त्यामुळे पितृदोष निघून जातो. त्यामुळे घरात धनधान्यांची वाढ होते. या दिवशी धार्मिक कार्यांसाठी आपल्या कमाईतील काही भाग दान करावा. असे केल्यास आपल्या संपत्तीत वाढ होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – पुराणांविषयी दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून पुराणांच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्यालयाला जुन्या पुराणांविषयी माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञ मंडळींना भेटावे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.