Headlines

अभिनेत्री पाहिजे तर अशी, प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने सांगितले मेकअप न करण्यामागचे कारण, जाणून तिचा तुम्हाला अभिमान वाटेल !

भारतीय चित्रपट सृष्टीमधल्या बॉलीवुडसोबतच साऊथकडील चित्रपटांची सुद्धा सर्वत्र हवा आहे. त्यातील कलाकार , त्यांचे स्टंटस्, त्यांची अभिनय शैली यासर्व गोष्टींची प्रेक्षकांवर मोहिनी आहे. दक्षिणेकडील काही कलाकार बॉलिवुडकरांना नेहमीच टक्कर देत असतात. त्यातीलच एक म्हणजे साई पल्लवी !

साई पल्लवी २९ वर्षांची झाल्यामुळे तिच्यावर जगभरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. साई पल्लवी नेहमीच तिच्या नितळ सौंदर्यामुळे चर्चेत असते. पण मंडळी तुम्हाला तिच्या सौंदर्याचे रहस्य माहित आहे का काय आहे… तर तिच्या नितळ सौंदर्याचे रहस्य म्हणजे नो मेकअप ! हो.. साई पल्लवी तिच्या चेहऱ्याची खुप काळजी घेते. त्यामुळे ती चेहऱ्याला मेकअप अजिबात लागु देत नाही. आणि समजा एखाद्या चित्रपटात जर तिला कोणी मेकअप करण्याची जबरदस्ती केली तर ती सरळ तो चित्रपटच नाकारते.

सध्याच्या झगमगत्या युगात आपण पडद्यावर खुप सुंदर दिसाव या करिता अनेक अभिनेत्री त्यांच्या चेहऱ्यावर मेकअपचे किती तरी थर लावुन वावरत असतात. पण साई पल्लवी या सर्वाला अपवाद आहे. ती मेकअप न करता पडद्यासमोर बिंधास्त आणि सहज अभिनय करते. त्यामुळेच कदाचित ती दक्षिणेतील सध्याची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

काही वर्षांपुर्वी टेड एक्सला दिलेल्या एका मुलाखतीत साईने तिच्या करीअर बद्दल सांगितले होते. त्यात तिने तिचे मेकअप न करण्यामागचे कारण सुद्धा सांगितले. ती म्हणाली की, “मेकअप करण्याला माझा विरोध नाही. पण मेकअप का करावा? अन् त्या मागचा उद्देश काय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या देशात गौरवर्णीय महिलांना सुंदर म्हटलं जातं.

त्यामुळं महिला गौरवर्णीय दिसण्यासाठी कॉस्मेटिकचा भरमसाठ वापर करतात. अन् या प्रवृत्तीला माझा विरोध आहे. कारण आपल्या त्वचेचा रंग कुठला असेल हे आपल्या हातात नाही. मग गोरं दिसण्याचा अट्टहास कशाला? अन् जे गोरे आहेत त्यामागे त्यांचं कर्तृत्व काय? त्यामुळं मी गोरं दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मेकअप करत नाही. किंबहुना आहे तशीच मला लोकांनी स्विकारावं अशी माझी अपेक्षा आहे.”

पैशांसाठी काही अभिनेत्री स्वता वापरत नसलेल्या फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीत काम करतात. मात्र साईने कोट्यावधी रुपयांच्या जाहिराती नाकरल्या जातात. ज्या चित्रपटात तिला गोर दिसण्यासाठी जबरदस्ती केली ते चित्रपट पण तिने नाकारले. तिने कधीच स्वताची तत्व सोडली नाही त्यामुळे ती सध्याची दक्षिणेकडील आघाडीची अभिनेत्री आहे. साई पल्लवीने आतापर्यंत कस्तुरी, प्रेमम, काली, दिया, मारी, लव्ह स्टोरी यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !