Headlines

फक्त घसा खवखवत असेल तर घाबरू नका करा हे घरगुती उपाय !

जरा हवामान बदलले की आजारपण लगेच सुरू होते. या प्रदूषणामुळे घसा दुखतो, घसा बसतो, खायला सुद्धा त्रास होतो. खासकरून लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु यावर नैसर्गिक पद्धतीने आपण कसे उपचार घेऊ शकतो याची आज माहिती घेणार आहोत.

लसूण – लसूण मध्ये सल्फर युक्त योगिक एलेसीन असते. हे एलेसीन बॅक्टेरियांचा नाश करण्यास मदत करते. आम्ही तुम्हाला लसुन चावून खायला सांगितल्यास तुम्हाला वेगळेच वाटेल परंतु लसुन ही घशातील खवखव आणि इतर इन्फेक्शन सोबत लढण्यास खूप मदत करते एवढेच नव्हे तर बाहेरील प्रदूषणा सोबत लढण्यास सुद्धा लसूण फायदेशीर असते.
मिठाचे पाणी – आपण अनेक लोकांना मिठाचे फायदे एकमेकांना सांगताना ऐकले असेल. हेच मीठ कोमट पाण्यात मिसळून त्याच्या गुळण्या केल्यास घशातील खवखव होत असल्यास आराम मिळतो. कोमट पाण्याने गुळण्या केल्यास घशात असलेल्या फ्लूइड्सला हे पाणी शोषून घेऊन काढून टाकते यामुळे गळ्यात आराम मिळतो.
हळदीचे दूध – घशातील खवखवी पासून मुक्तता मिळण्यासाठी दूधात हळद घालून पिण्याची प्रथा ही भारतात पूर्वीपासून चालत आलेली आहे. सर्दी-पडसे, ताप आणि घशातील दुखणे यासाठी हळदीचे दूध खूप फायदेशीर ठरते. हळदीच्या दुधात असलेले एंटी इनफ्लेमेटरी गुण घशाच्या दुखण्यास आराम मिळवून देतात.
बेकिंग सोडा – मिठाच्या बदली जर तुम्ही पाण्यात थोडेसा बेकिंग सोडा घालून त्याच्या बोलण्यात केल्यास सुद्धा आराम मिळू शकतो. बेकिंग सोडा घशात झालेले इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतो.
मध – मधामध्ये चांगल्या आरोग्यासाठी अनेक गुण लपलेले असतात. मधात असलेले एंटीऑक्सीडेंट आणि एंटी इनफ्लेमेटरी हे गुण घशातील खवखवी पासून आराम देतात. हे मध तुम्ही गरम दुधातून किंवा गरम लिंबू पाण्यासोबत घेऊ शकता.
आलं – आलं ठेचून ते पाण्यात उकळावे. हे पाणी थोडे कोमट झाल्यावर त्यात अर्धा लिंबाचा रस आणि मध घालावा व हे मिश्रण दिवसातून तीन-चार वेळा प्यावे. याने घसा दुखायला तर थांबतो पण त्याचबरोबर कफ पातळ होऊन खोकला देखील कमी होतो.
अडुळसा – घसा दुखत असेल तर अडुळसा देखील त्यावर अत्यंत परिणामकारक ठरतो. एक चमचा अडुळशाच्या पानांचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने आपल्याला आराम मिळतो.
घसा खवखवत असेल तर घाबरू नका करा हे घरगुती उपाय !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *