वयानुसार वेगवेगळ्या प्रकारचे आजारपण ओढवते. त्यामुळे वय वाढू लागले की आपल्याला आरोग्याची योग्य काळजी घेणे भाग असते. यासाठी विशेषतः दैनंदिन आहारात योग्य समतोल राखावा लागतो. योग्य व पौष्टिक अन्न पदार्थांचे सेवन केल्यास आजारपण दूर राहते. त्यामुळे वय वाढू लागले की डॉक्टर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पथ्य पाळण्याचे सल्ले देतात. प्रत्येक आजारपणाला वेगवेगळ्या प्रकारची पथ्ये असतात. काही आजारपणांना काही पदार्थ वर्ज असतात तर काही आजारपणात फक्त विशिष्ट अन्न पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
जेव्हा र*क्तवाहिन्यांमध्ये दबाव जास्त होतो तेव्हा उच्च र*क्तदाबाचा त्रास व्हायला सुरुवात होते. यालाच हायपर टेन्शन, किंवा हाय ब्ल*ड प्रेशर सुद्धा म्हणतात. खराब लाइफस्टाइल, अन हेल्दी डायट, वर्क प्रेशर, आणि स्ट्रेस यांसारख्या कारणांमुळे बीपी वाढतो. हाय बीपीचा त्रास असलेल्या रुग्णांना हार्ट अटॅक चा धोका जास्त असतो. त्यामुळे ज्या लोकां मध्ये ब्ल*ड प्रेशर चे प्रमाण १२०/८०mmHg हून अधिक असते त्यांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. सोबतच त्यांनी त्यांच्या डायटमध्ये सुद्धा काही बदल करणे आवश्यक आहेत.
1. कॉफी – कॅफे युक्त पेय – उच्च र*क्तदाब असलेल्या रुग्णांसाठी खतरनाक असते. त्यामुळे अशा रुग्णांनी चहा कॉफी यांसारख्या पेयांचे अधिक सेवन करू नये. कॉफी र*क्तदाबाचे प्रमाण वाढवण्याचे कार्य करते. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जे लोक कॉफीचे अधिक सेवन करतात त्यांच्यात स्ट्रेस लेव्हल वाढते ज्यामुळे बीपी अनियंत्रित होऊ शकतो. कॉफीच्या सतत सेवनामुळे शरीरातील कार्टीसोल हार्मोन अनियंत्रित होतात. यामुळे लोकांच्या मनात तणावग्रस्त स्थिती निर्माण होते.
2. मीठ आणि सोडियम – बीपी असलेल्या रुग्णांनी मीठ कमी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्यामुळे या रुग्णांनी ज्या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असेल असे पदार्थ खाणे टाळावे. पॅकेज आणि प्रोसेड फुड उदाहरणार्थ लोणचं, वेफर्स यांमध्ये सोडियमचे मात्र अधिक असते. म्हणून उच्च र*क्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी हे पदार्थ देखील खाऊ नयेत.
3. टोमॅटो सॉस – टोमॅटोपासून तयार केलेले पॅकेट बंद उत्पादन उदाहरणार्थ टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप हे बीपी असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक असू शकतात. या प्रॉडक्ट मध्ये सोडियम ची मात्रा खूप जास्त असते ज्यामुळे बीपी असलेल्या रुग्णांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो.
या पदार्थांचे सेवन केल्यास होतो फायदा – हाय ब्ल’ड प्रेशर असलेल्या रुग्णांना त्यांचे डायट खूप महत्त्वाचे असते. त्यांनी त्यांच्या आहारात पोटॅशियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. पोटॅशियम युक्त पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील ब्ल*ड प्रेशर चे प्रमाण नियंत्रित राहते. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आढळते. तसेच पालक, कोबी यांसारख्या हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे देखील फायदे होतात. याव्यतिरिक्त स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.