सध्या प्रत्येकाची जीवनशैली इतकी व्यस्त आहे की प्रत्येकजण काम पटापट कशी उरकतील याकडे लक्ष देतात. त्या्मुळे असे करण्यासाठी कमी वेळेत काय जास्त आणि सोयीस्कर होईल याकडे प्रत्येकाचा कल असतो. अशातच जेवण बनवता ते लवकर शिजावे व इंधनाची बचत व्हावी यासाठी अनेक जण प्रेशर कुकरचा वापर करतात. पण मंडळी तुम्ही सुद्धा असे जेवण बनवत असाल तर सावधान… कारण लवकर आणि कमी इंधन वापरुन जेवण बनवण्याच्या नादात तुम्ही तुमचे आरोग्य बिघडवत आहात.
प्रेशर कुकर मध्ये जेवण बनवणे जितके फायद्याचे असते त्याहुन अधिक त्याचे धोके असतात. काही गोष्टी कुकरमध्ये शिजवुन खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुकर मध्ये कोणत्या गोष्टी शिजवाव्यात व कोणत्या शिजवु नये याबद्दल सांगणार आहोत.
जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये पोषक तत्वांनी युक्त अशा भाज्या शिजवत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. कुकर मध्ये अशा भाज्या शिजवुन खालल्यास त्याच्यातील पोषक तत्वे बाहेर जात नाही. पण याच भाज्या जर तुम्ही दुसरीकडे शिजवलात तर त्यातील पोषक तत्वे जास्त गरम केल्यामुळे संपुन जातात.
मात्र ज्या पदार्थांमध्ये स्टार्च भरपुर प्रमाणात असतात अशा गोष्टी कुकर मध्ये शिजवल्या तर त्या आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. यामध्ये बटाटा, पास्ता यांसारख्या गोष्टीचा समावेश असतो. या गोष्टी कुकर मध्ये शिजवल्यास त्यात एक्रिलामाइड नामक केमिकल तयार होते.
एक्रिलामाइड हे एक कार्सिनोजेनिक केमिकल आहे. कार्सिनोजेनिक म्हणजे जे पदार्थ कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. त्या केमिकलचा आपल्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो. याशिवाय असे पदार्थ खाल्यास कॅन्सर आणि न्यूरालॉलिकल डिसॉर्डर यांसारखे आजार होतात.
स्टार्च आणि कार्बोहायड्रेट जर ओव्हरहिट केले तर त्यामुळे सुद्धा कॅन्सरचा धोका उद्भवतो. तसेच चिकन मटण यांसारखे पदार्थ तयार करण्यास खुप वेळ लागतो. त्यामुळे अशा गोष्टी शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. जे करणे योग्यच आहे. कारण उघड्या भांड्यात मटण किंवा चिकन शिजवल्यास ते पचायला जड जाते. कुकरमध्ये शिजवलेले चिकन पटकन शिजते.
या लेखाची खात्री करून घेण्यासाठी https://www.cancer.org/cancer/cancer-causes/acrylamide.html या लिंक वरून माहिती घेऊ शकता !
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे.