सध्या कोरोना सोबतच वेगवेगळे साथीचे रोग देखील पसरत आहेत. या मागील महत्वाचे कारण म्हणजे सध्याच्या हवामानात सतत होणारे बदल आणि माणसांच्या खाण्यापिण्याच्या सवयी. या गोष्टींमुळे जूलाब किंवा अतिसार होण्याची शक्यता असते. जुलाबासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत. मात्र असे असून देखील लोक घरगुती उपायांवर अधिक भर देतात. या मध्ये विशेषत: जुलाब झाल्यावर केळे खाण्याचा सल्ला दिला जातो. केळे खाल्ल्यामुळे शरीराला बळकटी येते असे म्हणतात.
केळे हे असे फळ आहे जे कोणत्याही ऋतुत सहज उपलब्ध होते. केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आतड्यांसंबंधीत आजारांसाठी ते उपयुकत ठरते. खरेतर केळे हा विश्वासार्ह पारंपारिक उपाय आहे. केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते यामुळे शरीरातील पचनक्रिया सूरळीत होण्यास मदत होते असे धर्मशिला सुपरस्पेशालिेस्ट हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. महेश गुप्ता यांचे म्हणणे आहे.
केळे हे तंतुमय फळ आहे. त्यामध्ये उर्जा, साखर आणि सोडियमचे मिश्रण असते. याचा उपयोग मोठ्या आतड्यातील मीठ व पाणी शोषुन घेण्यासाठी होतो यामुळे मल स्थिर असे त्यांनी इंडियनएक्सप्रेस.कॉमला सांगितले. केळे पचनास हलके असल्यामुळे ते अशक्तपणा आणि डिहायड्रेशन कमी करते.
केळ्यामध्ये असलेल्या कार्बोहायड्रेटमुळे कॅलरी मिळतात. याचा उपयोग जुलाबामुळे शरिरात निर्माण झालेला अशक्तपणा दुर करण्यास होतो. तसेच शरीरास उर्जा मिळते असे नवी दिल्लीतील फोर्टिस वसंत कुजच्या क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट प्रमुख सिमा सिंह यांनी सांगितले.
मुंबईतील भाटीया हॉस्पिटलच्या पोषणतज्ज्ञ झोया फाखी यांनी सांगितले कि, केळ्यामध्ये 100 ते 116 कॅलरीज् असतात. यामुळे जुलाबामुळे कमी झालेली शरीरातील उर्जा पुन्हा निर्माण होण्यास मदत होते. कच्चा केळयात आढळणारे फायबर आतड्यांमधील अतिरीक्त पाणी शोषुन त्याचे रुपांतर मलामध्ये करते असे अभ्यासातुन सिद्ध झाले.
केळाचे सेवन कसे करावे – केळे आणि थोडेसे दही यांचे एकत्रित सेवन करणे ही पारंपरीक पद्धत असुन यामुळे भरपूर फायदा होतो असे सिंह यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मीठाबरोबर केळी खाल्यास शरीरास सोडियम आणि पोटॅशियम व इलेक्ट्रोइटस् असतात याचा उपयोग अतिसार झाल्यास होतो. वारंवार जुलाब होत असल्यास मीठाबरोबर केळ्याचे दोन किॆवा तीन वेळा सेवन करावे. काही वेऴेस साधे अन्न खाण्यास देखील त्रास होतो अशावेळी दहीभातासोबत केळ्याचे सेवन करु शकता असे फाखी यांनी सांगितले.
केळी घेताना ती चांगली आहेत की नाही, कच्ची तर नाही ना या सर्व गोष्टींची दक्षता बाळगावी नाहीततर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या असे न्युट्रिशनिस्ट सल्ला देतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !