मनुष्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम शरीरातील प्रत्येक अवयव करत असतो. त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक असते. सध्या बाजारात शरीराचे सौंदर्य वाढवणारे वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत. मात्र ते घेऊन उगीच पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्याकडे अनेक घरगुती उपायसुद्धा उपलब्ध आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला ओठांचा काळेपणा दुर करण्यासाठी घरगुती उपाय काय केले पाहिजे हे सांगणार आहोत.
ओठ हे मऊ मुलायम, गुलाबी असावेत असे प्रत्येकाला वाटते पण काही कारणास्तव ते काळपट, रुक्ष आणि भेगाळलेले होतात. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाण्याची कमतरता, ओठांवर ब्युटी प्रोडक्टसचा भडिमार यांसारख्या अनेक कारणांमुळे ओठ काळपट होतात. तुम्हीसुद्धा अशा समस्यांना सामोरे जात असाल तर तुमच्यासाठी काही खास उपाय !
महिला किंवा तरुणींना त्यांच्या चेहऱ्यांच्या सौंदर्यासाठी ओठांची काळजी घ्यावी लागते. कारण जर ओठ काळपट, रुक्ष झाले तर चेहरा प्रभावशाली दिसत नाही. त्यासाठी-
बदामाचे तेल – ओठांवर काळे डाग दिसत असतील तर रात्री झोपयच्या आधी बदामाचे तेल ओठांना हलके मालिश करुन लावा. सकाळी उठल्यावर ते स्वच्छा पाण्याने साफ करा. असे काही दिवस केल्यास तुमच्या ओठांचा काळपटपणा नक्कीच दूर होईल. तसेच त्यांचा रुक्षपणासुद्धा जाईल.
मध – मधामध्ये एंटीऑक्सिडेंटचे प्रमाण खुप असते. शिवाय त्यात ब्लीचिंग एजेंडसुद्धा असतात. दोन थेंब मधा मध्ये दोन थेंब लिंबाचा रस मिसळा आणि तयार मिश्रण २० मिनीटे ओठांना लावा. त्यानंतर ओठ स्वच्छ पाण्याने धुवा. अशाने तुमचे ओठ काळपट होणार नाहीत.
साखरेचे स्क्रब लावा – ओठांचा काळपटपणा दूर होण्यासाठी साखरेचा स्क्रब तयार करा आणि ते ओठांना लावा. यासाठी एक चमचा साखरेत काही लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. आणि ते मिश्रण ओठांवर स्क्रबसारखे रगडा आणि नंतर ओठ धुवा. ही प्रक्रिया आठवड्यातुन दोनतीन वेळा केल्यास ओठांची डेड स्किन निघुन जाईल. तसेच काळपटपणासुद्धा निघुन जाईल.
मुबलक प्रमाणात पाणी प्या – ओठ आणि त्वचेवरील रुक्षपणा हा शरीरातील पाण्याच्या कमतरते मुळे होतो. त्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्या. त्यामुळे ओठ रुक्ष होणार नाही. ते नरम राहतील.
काकडीचा ज्युस लावा – ओठांवरील काळेपणा दुर करण्यासाठी तसेच ते मऊ करण्यासाठी त्यांच्यावर काकडीचा ज्युस लावा. ओठांना काकडीचा ज्युस २० मिनिटे लावुन ठेवा. त्यानंतर ते पाण्याने धुवा. त्यानंतर काकडी कापुन तीसुद्धा हलक्या हाताने ओठांवर रगडा. त्यामुळेसुद्धा ओठ मऊ होतात. त्याच्यात मऊपणा येतो तसेच त्यांच्यावरील काळे डाग नाहीसे होतात. काकडीमध्ये ब्लीचिंग आणि हाईड्रेटींग गुण असतात. जे ओठांना मॉश्चिराइज करण्यास उपयुक्त होतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !