थंडीचा हंगाम सुरु झाला आहे. वातावरणातील गारवा हळुहळु जाणवू लागला आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात घ्यायच्या काळजीला लोकांची लगबग सुरु झाली आहे. या काळात विशेषत: त्वचे संबंधी समस्या उद्भवतात. त्वचा रुक्ष पडते. तर काही वेळेस ती पांढरी सुद्धा पडते. याशिवाय थंडीच्या दिवसात ओठांसंबंधीसुद्धा तक्रारी असतात.
या ऋतूत ओठांना भेगा पडतात. त्यामुळे ते झोंबतात. सध्या हवामानातील बदल हा सतत होत असतो त्यामुळे ओठांना भेगा पडण्याचा कोणता विशिष्ट काळ उरलेला नाही. चेहरा सुंदर दिसण्यासाठी ओठ महत्वाचे कार्य बजावतात. त्यामुळे ओठांची काळजी घेणे आवश्यक आहे.
ओठ कोरडे होण्यापासुन रोखण्यासाठी व त्यांना भेगा पडू नये यासाठी आपल्या बेंबी मध्ये थोडेसे तेल लावा. आता तुम्हाला वाटत असेल की, भेगा ओठांना पडतात मग तेल बेंबीला लावुन काय उपयोग.. तर उपयोग आहे. कारण बेंबीचे कनेक्शन थेट गर्भनाळेसोबत असते. यामुळे ओठ चांगले होतातच शिवाय यामुळे त्वचा देखील तजेलदार होते.
शिवाय त्वचेसंबधी समस्या देखील दूर होतात. त्वचेला कोणत्याही प्रकारचे इनफेक्शन होत नाही. पण बेंबीमध्ये नक्की कोणते तेल लावावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चिंता नसावी. आम्ही तुम्हाला या तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो.
बदाम तेल – बदामाच्या तेलात विटामिन ई मोठ्या प्रमाणात असते. हे तेल हलके गरम करावे. त्यातील थोडे बेंबीमध्ये घालावे. हा उपाय केल्यास तुमच्या ओठांना भेगा पडणार नाहीत. शिवाय तुमची त्वचा तजेलदार राहिल.
राईचे तेल – राईच्या तेलाचा वापर अधिकतर जेवणात केला जातो. मात्र याचे काही औषधी गुणधर्म देखील आहेत. राईचे तेल बेंबीत लावल्यास तुमचे ओठ फाटणार नाहीत. शिवाय तुमची त्वचा सुद्धा मुलायम बनेल.
नारळाचे तेल – नारळाचे तेल केसांना लावुन मालिश केल्यास केस दाट आणि काळेभोर होतात हा फायदा आपल्याला माहित आहे. नारळाच्या तेलात विटामिन ई असते. त्यामुळे ते जर बेंबीत लावले तर त्वचा खुप चांगली होते आणि भेगा पडलेले ओठ देखील चांगले होतात.
तूप – तूप हा स्निग्ध पदार्थ आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स असतात. शिवाय थंडीच्या दिवसात तूपाचे सेवन केल्यास शरीराला उर्जा मिळते. पण या व्यतिरिक्त जर तुम्ही तूपाचे काही थेंब बेंबीत लावल्यास त्वचा चांगली होतेच शिवाय ओठ देखील मुलायम होतात.
कडूलिंबाचे तेल – कडूलिंबाच्या तेलात चिकटपणा असतो. तसेच त्यात एंटीबॅक्टीरीयल गुण सुद्धा असतात. कडूलिंबाच्या तेलात एंटी-ऑक्सीडेंट्स असतात. रात्री झोपण्यापुर्वी किंवा अंघोळी पुर्वी अर्धा तास कडूलिंबाचे तेल लावल्यास ओठ मुलायम होतात. तसेच त्वचेवरील काळे डाग किंवा पिंपल्स सुद्धा नाहीसे होतात. यामुळे त्वचेला इंफेक्शन होत नाही.
लेमन ऑइल – लिंबाचा अधिकतर वापर जेवणामध्ये केला जातो. जेवण रुचकर बनवण्यासाठी लिंबू वापरला जातो. लिंबा मध्ये विटामिन सी असते. याशिवाय लिंबाचे तेल बेंबीमध्ये लावल्यास कोरडे पडलेले ओठ मुलायम होतात. तसेच त्वचा देखील तजेलदार होते.
ऑलिव ऑइल – ऑलिव्ह ऑइल बेंबीत लावल्यास ते त्वचा आणि ओठांसाठी फायदेशीर असते. ऑलिव ऑइल मध्ये विटामिन ई भरपूर प्रमाणात असते. ते जर बेंबीत लावल्यास ओठ चांगले होतात. आणि त्वचेत सुध्दा निखार येतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शास्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.