परवापासून उडालेल्या धुराळ्यामुळे बऱ्याच जणी ब्रेसीयर च्या वापराबाबत बुचकळ्यात पडल्या आहेत. त्यांच्या शंका दूर करण्यासाठी हा लेखप्रपंच.
ब्रेसीयर चे फायदे – १. स्त*न हा मेद पेशींनी बनलेला अवयव आहे. त्यात आधार देणाऱ्या काही लिगामेंट्स असतात पण त्या खूप बळकट नसतात. विशेष करून एकदा स्त*नाचा आकार वाढला की बाहेरून वेगळा आधार गरजेचा असतो. गरोदरपणात व स्त*न*पान चालू असताना हा आधार न मिळाल्यास स्त*न ओघळू शकतात आणि एकदा ओघळले की त्यानंतर प्लास्टिक स*र्ज*री शिवाय दुसरा उपाय करता येत नाही.
२.स्त*नांना नीट आधार न मिळाल्यास स्त*न*दुखी सुरू होते. ही स्त्रियांमध्ये नेहेमीच आढळणारी समस्या आहे. यामध्ये योग्य मापाची ब्रा वापरणे आवश्यक आहे. खेळाडू स्त्रियांनी स्पोर्ट्स ब्रा वापरणे हितकारक आहे. ब्रेसीयर च्या वापरामुळे स्त्रीचे posture म्हणजे उभे राहणे आणि बसणे याची पद्धत सुधारते. पाठीचा कणा सरळ राहण्यास मदत होते आणि त्यामुळे पाठीची आणि मानेची दुखणी कमी होऊ शकतात.
३. ब्रेसियरची निवड – ९५% भारतीय स्त्रिया चुकीची ब्रा वापरतात असं लक्षात आले आहे. साधारणपणे कुठलाही विचार न करता अंदाजाने साईझ ठरवून मिळेल ती ब्रेसियर विकत घेण्याचा स्त्रियांचा कल आहे. हे स्त*ना*च्या आरोग्याच्या दृष्टीने सुध्दा चुकीचे आहे.
ब्रा निवडण्यासाठी तीन साधे नियम आहेत – १) कप साईझ निवडताना कप मोकळाही राहू नये तसेच ब्रेस्ट कोंबून बसवली जाऊ नये. कप साईझ A, B, C, D, E ट्रायल करून घ्यावेत. २) ब्राचे खांद्यावरचे पट्टे त्वचेत रुतु नयेत तसेच निसटून येतील इतके सैलही नसावेत. ३) ब्राचे ३०, ३२, ३४ हे साईझेस ब्रेस्टच्या खालच्या भागाचे असतात. त्याचीपण व्यवस्थित ट्रायल घ्यावी. स्त्रीला श्वास व्यवस्थित घेता यायला हवा व कुठलेही वळ छातीवर पडू नयेत. ब्रेसीयर चं मुख्य काम ब्रेस्ट ना योग्य तोआधार देणं हे असतं. काही जणी हेच विसरतात आणि खूप सैल ब्रा घालतात. ब्रेस्ट चा आकार सुडोल दिसावा यासाठी ब्रा चे पट्टे ऍडजस्ट करणं गरजेचं आहे.
४. मानवी शरीरात अनेक आकार प्रकार असतात. प्रत्येक स्त्रीला सुदौल स्त*न असतीलच असं नाही. अशा वेळी ब्रेसीयर मुळे स्तनाचा आकार आणि उभार चांगला दिसल्यामुळे स्त्रीला नक्कीच आत्मविश्वास निर्माण होतो हे नाकारता येणार नाही.
५.ब्रेसीयर रात्री झोपताना नक्कीच काढून ठेवावी. तसेच सैल झालेल्या ब्रेसीयर वेळेवर बदलणे पण आवश्यक आहे. ६. दिवसा ब्रेसीयर वापरताना जर आवळल्याचा फील येत असेल आणि खूप uncomfortable वाटत असेल तर तुमचा ब्रा साईझ चुकला आहे असं समजायला हरकत नाही. ७. ब्रेसीयर मुळे काही जणींना त्रास होत असेल तर ब्रा ची निवड योग्य रीतीने करणे किंवा त्याही पेक्षा महत्वाचे स्त*न संबंधी काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाणे उत्तम. अजून एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वजनावर नियंत्रण असेल तर स्तनाच्या समस्या कमी होतात. लठ्ठपणामुळे बोजड झालेल्या स्तनांना ब्रा चा आधार अत्यंत गरजेचा असतो.
७. आपल्या सगळ्यांनाच घरी आल्यावर घरचे कपडे घालून खूप छान आणि सुटसुटीत वाटतं म्हणून तेच कपडे घालून आपण बाहेर तर नाही ना जात?काही गोष्टी समाजात वापरताना स्त्री आणि पुरुष दोघांनाही पाळाव्यात लागतात. उद्या पुरुष शर्टाची सगळी बटणं उघडी टाकून किंवा बरं वाटतंय म्हणून छोट्या शॉर्टस घालून हिंडायला लागले तर चालेल का ? स्त्री काय किंवा पुरुष काय समजुतीने वागण्यातच शहाणपणा आहे असं वाटतं मला..तुम्हाला काय वाटतं?
डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्री रोग व वंध्यत्वतज्ज्ञ
पुणे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !