आंबटगोड फेम अभिनेत्री केतकी चितळे ही कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती कोणतीना कोणती वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते असे म्हटल्यास हरकत नाही. केतकीने आता पुन्हा एकदा एक नवा वाद तिच्या अंगाशी ओढवुन घेतला आहे. या वेळी तिने थेट शरद पवार पंगा घेतला आहे. केतकीने तिच्या फेसबुक अंकाउंटवर शरद पवार विरोधात पोस्ट केली आहे. तिच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अनेकांनी तिने केलेल्या पोस्टला कमेंट केली आहे. केतकी ने तिच्या पोस्टमध्ये एक कविता सादर केली आहे.
तुका म्हणे पवारा । नको उडवू तोंडाचा फवारा ॥ ऐंशी झाले आता उरक वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे सतरा वेळा लाळ गळे || समर्थांचे काढतो माप ते तर तुझ्या बापाचेही बाप ॥ ब्राह्मणांचा तुला मत्सर कोणरे तू ? तू तर मच्छर || भरला तुझा पापघडा । गया नाही तर होईल राडा ॥ खाऊन फुकटचं घबाड वाकडं झालं तुझं थोबाड || याला ओरबाड त्याला ओरबाड तू तर लवाडांचा लबाड ||
यापुर्वी भाजपाने डोंगराचे ढोल या संग्रहाततील पाथरवाट ही कविता लोकांसमोर सादर केली . या कवितेवर भाजपाने धर्माशी संबंध जोडत पवारांवर टिका केली. त्यात आता पुन्हा एकदा केतकीने तिची नवी कवितासादर करत पवारांवर टिका केली आहे.
वादांवरुन ट्रोल व्हायची केतकीची ही पहिलीच वेळ नाही. या पुर्वी होळीला सोसायटीतील मुलांच्या वादांवरुन तर नंतर शिवाजी महाराजांबद्ददल वादग्रस्त विधान केल्याबद्दल तिला ट्रोल केले होते. त्यावेळी तिच्यावर एट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा शरद पवारांवर वादग्रस्त विधान केल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल झाला.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !