Headlines

साडी घालून या आजीबाईने मारली नदीत उडी, व्हिडीओ पाहून काळजाचा ठोका चुकेल !

मित्रांनो जसं जसं तंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तसा मनुष्य इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागला आहे. आज लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या हातामध्ये मोबाईल, लॅपटॉप आपल्याला पाहायला मिळतो. मोबाईल वापरत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करत असतो, त्यामध्ये फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम यांचा आवर्जून वापर केला जातो. या सर्व माध्यमांवर रोज काहीना काही नवीन घडत असते.

जगभरातल्या घटना आपल्याला सेकंदामध्ये कळत असतात. कधी कुणीतरी पराक्रम केला, कोणी रेल्वे समोर उडी मारली, कुणी रेल्वे डब्यावर वर चढला, एखाद्या व्यक्तीने असा किल्ला सैर करून पराक्रम केला, एखाद्या व्यक्तीने नाणे गिळले, अशा प्रकारच्या विविध घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात परंतु आज आम्ही तुम्हाला अशी घटना सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही देखील आश्चर्यचकित होणार आहात. ही घटना सोशल मीडियावर हल्ली चर्चेचा विषय बनलेली आहे आणि ही घटना एका आजीबाईच्या संदर्भात आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक 50 ते 60 वर्ष असणाऱ्या आजीबाई एका नदीमध्ये उडी मारत आहे आणि या नदीचे पात्र इतके विशाल आहे की, बघणाऱ्यांची एकंदर तारामबळच उडाली आहे असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये 50 ते 60 वय वरच्या आजीबाई ताम्रभूर्णी नावाच्या नदीवरील पुलावर उभ्या आहेत. या आजीबाईंनी साडी नेसलेली असून तरी त्यांनी दाखवलेला धाडसपणा हा अवर्णनीय आहे. नदीपासून या पुलाची उंची सुमारे 40 फूट पेक्षा जास्त आहे, असे देखील म्हटले जात आहे. पुलावरून उडी मारताना या आजीबाई अजिबात घाबरल्या नाही. पूर्ण आत्मविश्वासाने व संयमाने यांनी उडी मारली आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट देखील लोक करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला या नदीमध्ये नेहमी आंघोळीला येत असते, मात्र यावेळी एका तरुणाने या महिलेला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता लपून व्हिडिओ काढला आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. सोशल मीडियावर अपलोड करताच सेकंदाच्या आत हा व्हिडिओ इतका प्रसिद्ध झाला की अनेकांनी या आजीबाईच्या धाडसाचे कौतुकच केले.

सर्व स्तरातून आजीबाईचे कौतुक झाले काहींनी आजीबाईला वेडे देखील ठरवले तसेच जीवाची परवा न करता ही महिला आजीबाई इतके धाडस करते हे नवलच आहे असे देखील अनेकांनी म्हटले. पाण्यामध्ये उडी मारताना या महिलेने कोणत्याही प्रकारचा सूट घातला नव्हता. अस्सल मराठी वेषातील साडी नेसून या महिलेने पाण्यामध्ये उडी मारली आहे म्हणूनच या महिलेचे कौतुक देखील केले जात आहे.

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला. एका महिलेने जर ठरवले तर ती काहीही करू शकते, याची प्रचिती या व्हिडिओ वरून आली म्हणूनच भारतीय महिला या कोणत्याही गोष्टीत कमी नाही याची जाणीव देखील अनेकांना हा व्हिडिओ पाहून झाली आहे.जर महिलेने विचार केला तर ती काही करू शकते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना एक डायलॉग नक्कीच आठवला असेल तो म्हणजे वो स्त्री है, वो चाहे तो कुछ भी कर सकती है!.