Headlines

जान्हवी कपूरचा आईच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर खळबळ जनक खुलासा, जे माझ्यासोबत झाले मी त्याच लायकीची आहे … !

जान्हवी कपूर सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. जान्हवी ने आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये कार्य केलेले आहेत. ज्याच्या चित्रपटांमध्ये कार्य केलेले आहेत ते सर्व चित्रपट सुपरहिट ठरलेले आहेत. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला देखील जमा केला आहे. जान्हवी कपूर बद्दल बोलायचे झाल्यास जान्हवी ही प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि दिग्गज अभिनेत्री स्वर्गीय श्रीदेवी यांची मुलगी आहे.

जान्हवी ने आपल्या चित्रपट करिअर ची सुरुवात चित्रपट धडक द्वारे केली होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. ज्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच वर्षी तिच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता. ती घटना घडताच तिच्या संपूर्ण आयुष्य बदलून गेले होते. 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईमध्ये बाथ टब मध्ये बुडून मृत्यू झाला होता असे नंतर तपासणीच्या निष्कर्षात कळाले.

जान्हवी च्या जीवनामध्ये तिच्या आईचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते. आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी तिला मिळालेल्या आहेत त्या सर्व आईच्या कृपेने मिळाले आहेत असे तिचे मान्य आहे. आईच्या मृत्यूनंतर जान्हवी चे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे, याची झळ तिला देखील बसलेली आहे आणि म्हणूनच जान्हवी कपूरने श्री देवीच्या मृत्यू नंतर तिच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये फरक जाणवल्या त्या देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

जान्हवी कपूर ने म्हटले की, जेव्हा माझ्या आईचा मृत्यू झाला तेव्हा माझ्या जीवनाचा संपूर्ण आलेख बदलून गेला. मला आज ही विश्वास बसत नाही की माझी आई मला सोडून गेली आहे… आता कुठे मी तिच्या निधना च्या दुःखातून सावरत आहे परंतु मी जेव्हा जेव्हा बाहेर जाते, ती माझ्यासोबत आहे अशी जाणीव देखील मला होते म्हणून मी तिची आवडती एखादी वस्तू तरी माझ्यासोबत नेहमी ठेवत असते… यामुळे ती माझ्यासोबत आहे असा भास मला होतो!..

आईच्या मृत्यूनंतर जानवी संपूर्णपणे एकटी पडली होती म्हणूनच तिने जास्तीत जास्त कामांमध्ये वेळ व्यतीत करण्याचे ठरवले, जेणेकरून ती स्वतःला सिद्ध करू शकेल. तिची आई देखील नेहमी कामांमध्ये व्यस्त राहायची म्हणूनच श्रीदेवी म्हटले की एक यशस्वी अभिनेत्री आपल्या डोळ्यासमोर यायची. जान्हवी ला देखील आपल्या आईप्रमाणे यशस्वी अभिनेत्री बनायचे आहे. जान्हवीला खूप सारी मेहनत करून आईसारखे बनायचे आहे.

जान्हवी ने असे देखील म्हटले की, जेव्हा माझी आई वारली तेव्हा नेमके काय काय घडले ते देखील मला आठवत नाही, कारण की मी पूर्णपणे सुन्न झाली होते, आता कुठे स्वतःला सावरत आहे! कामाबद्दल बोलायचे झाल्यास जान्हवी कपूर यावर्षी अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर चित्रपट मिस्टर अँड मिसेस माही मध्ये देखील प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. आज देखील जान्हवी आपल्या आईला तितकेच मिस करते!