Headlines

नागपूर मध्ये ऑनलाईन व्हिडिओ बघून अल्पवयीन मुलीने घरीच दिला बाळाला जन्म…अपुऱ्या उपचारामुळे बाळाचा मृत्यू !

हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल, लॅपटॉप पाहायला मिळतो. प्रत्येक व्यक्ती ,जग इंटरनेटमुळे जवळ आलेले आहे, असे म्हटले जाते. इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या आपल्याला हवी असलेली माहिती आपण एका क्लिकच्या आधारावर सहज मिळवू शकतो परंतु इंटरनेटचा अतिरिक्त प्रमाणात केलेला वापर तुमच्या साठी धोकादायक देखील ठरू शकतो. हल्ली तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करते परंतु तंत्रज्ञानाच्या आधारे मिळवलेली संपूर्ण माहिती पूर्णत्वास नेणारी नसते.

अनेकदा अपुऱ्या माहितीमुळे तुमचे नुकसान देखील होऊ शकते, याची प्रचिती अनेकदा तरुण पिढीला येत असते परंतु तरुण पिढी इंटरनेटच्या व ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून इतक्या आहारी गेली आहे की खूप सारी जनजागृती करून देखील तरुणांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट फिट बसतच नाही, अशीच एक घटना महाराष्ट्रातील नागपूर येथे घडलेली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनामुळे एक मोठा अनर्थ झालेला आहे.

महाराष्ट्र राज्यातील नागपूर शहरांमध्ये एका कथित लैंगिक शोषणाची बळी ठरलेली 15 वर्षीय मुलीने युट्युब वर व्हिडिओ पाहून घरातच एका बाळाला जन्म दिला ,परंतु जन्म दिल्यानंतर त्या मुलीने आपल्याच पोटच्या नवजात बालकाची हत्या देखील केली. ही घटना घडल्यानंतर ची माहिती नागपूर पोलिसांनी माध्यमांना दिली.

एका पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, या मुलीचे शोषण करणारा व्यक्ती हा तिचा ओळखीचा होता. या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली होती, त्यानंतर त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की मैत्रीचे रूपांतर कधी लैंगिक शोषणामध्ये झाले हे देखील कळले नाही. पीडित मुलगी ने स्वतःवर अत्याचार झाल्यानंतर देखील मुलीने स्वतः गरोदर असल्याची बातमी देखील आईपासून लपवली होती. त्याचबरोबर या सर्व काळात तिला अनेक आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत होत्या. आपल्याला बरे वाटत नाही असे सांगून तिने ही परिस्थिती घरच्यांपासून लपवली होती.

नागपूर शहरात राहणारी ही मुलगी इतकी हुशार निघाली की गरोदरपणाची बातमी कुणालाच कळू नये तसेच आपल्याला झालेले बाळ घरच्यांना तसेच आजूबाजूला कळू नये, याकरिता तिने इंटरनेटवर युट्युब व्हिडिओ पाहिला. दोन मार्चलाच राहत्या घरी एका मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिल्यानंतर तिने नवच्यात बालकाची गळा दाबून हत्या केली. बाळाची हत्या केल्यानंतर तिने घरामध्ये असणाऱ्या एका डब्यात काही दिवस शव लपवून ठेवले होते.

जेव्हा आई बाहेरून घरी आली, तेव्हा मुलीला तब्येतीबद्दल विचारलं त्यानंतर मुलीने घरामध्ये जे काही घडले ते सारे आईला सांगितले. ही सारी परिस्थिती कळताच मुलीच्या आईने तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेले आणि पुढील उपचार केले. नवजात बालकाचे पोस्टमार्टम देखील करायला पुढे नेले. ही सर्व घटना पोलिसांनी भारतीय दंड संहिता आयपीसी आणि लैंगिक अपराध यांच्या द्वारे लहान मुलांचे संरक्षण अधिनियम कायदा अंतर्गत हे प्रकरण दाखल केले. नवजात बालकाच्या पोस्टमार्टम चा रिपोर्ट आल्यानंतर हत्येचा आरोप देखील या मुलीवर लावण्यात येईल आणि आवश्यक ती शिक्षा देखील तिला न्यायालय सूनावेल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात सर्व दोषींना शिक्षा तर मिळेलच पण त्याचबरोबर पुढील तपासणी देखील करण्यात येईल.

ही घटना आजूबाजूला कळताच दिवसाढवळ्या माणुसकीला कायम फासणारी बाजू आपल्या सर्वांना दिसली तसेच इंटरनेटवर व्हिडिओच्या माध्यमातून देखील नको त्या घटना घडण्याची ही काही पहिली वेळ नाही. तरुण पिढीने स्वतःला सक्षम बनवण्यासाठी आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंटरनेटचा योग्य तो वापर करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा गुन्हेगारी निर्माण होऊ शकते याचे भान देखील ठेवायला हवे.