Headlines

‘आई कुठे काय करते’ फेम ‘अरुंधती’चे मॉडर्न फोटो पाहून वेडे व्हाल, बघा फोटोज !

स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका सध्याच्या काळात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका म्हणजे आई कुठं काय करते ! या मालिकेमधील प्रत्येक कलाकाराने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. एक आई ही तिच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी तिचे संपूर्ण आयुष्य कसे समर्पित करते, परंतु तरीही तिच्या प्रयत्नांकडे कुटुंबातील सदस्यांचे दुर्लक्ष असते. अशी या मालिकेची मध्यवर्ती कल्पना आहे.

या कथेभोवती फिरणारी ही मालिका सोबतच इतर विषय देखील लीलया हाताळत त्यांना पूर्ण न्याय देते. या मालिकेत आईची भूमिका पार पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर आहेत. या अभिनेत्री तर आहेतच पण सोबत त्या एक उत्तम गायिका व दिग्दर्शिका देखील आहेत.
मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी वयाच्या १६ व्या वर्षी तिच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांना नाटकामधील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला. त्यांनी प्रथम इंद्रधनुष्य या कार्यक्रमात काम केले. मधुराणी आणि त्यांचा पती प्रमोद प्रभुलकर यांनी एक मिरॅकल्स असिटिंग अकॅडेमी सुरु केली, २००३ मध्ये मधुराणी व त्यांचा पतीने मिळून “गोड गुपीत” हा चित्रपट तयार केला होता.

“तुमचं आमचं सेम असतं” या नाटकातही त्यांनी अभिनय केला होता. “सा रे गा मा पा” मधे गाण्याची कौशल्ये दाखविली आणि संगीतकार म्हणून सुंदर माझे घर हा चित्रपट मिळाला. सोबतच नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील त्यांची भूमिका देखील सर्वांनाच आवडली होती. अशा रीतीने अभिनय क्षेत्रात स्वतःचे स्थान त्यांनी निर्माण केले आहे.


सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्याकारणाने इतर गोष्टींसोबत शूटिंग देखील बंद करण्यात आले आहे, त्यामुळे सर्वच मालिका या शूटिंगसाठी विविध ठिकाणी गेल्या आहेत. तर आई कुठे काय करते! या मालिकेची टीम सध्या सिल्वासामध्ये शूटिंग करत आहे व सोबतच फावल्या वेळेत तेथील निसर्गाचा आनंद घेत धमाल देखील करत आहे. आजच या मालिकेतील कलाकारांचा एक सेल्फी व्हायरल झाला आहे. सर्व महिला वर्गाने सुंदर असं फुल आपल्या कानावर ठेवत इतर कलाकारांसोबत हा सेल्फी काढला आहे.

या सेल्फीमध्ये सर्वांच्या लाडक्या अरुंधतीचा एक वेगळाच लूक पाहून चाहता वर्गाकडून या लुकबद्दल प्रतिक्रिया येत आहेत, काहींनी नाक मुरडत तर काहींनी तिच्या या नव्या लुकबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. अरुंधतीच्या अभिनयाचे देखील या दरम्यान कलाकारांनी कौतुक केले आहे. या फोटोसोबतच अरुधंती व संजना एका झोपाळ्यावर मनसोक्त झोका घेताना दिसत आहेत, असा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ संजना म्हणजेच रुपाली भोसले हिने सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

आई कुठे काय करते! या मालिकेत सध्या सर्वांनीच ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहिली आहे तो क्षण दिसणार आहे, तो म्हणजे अरुंधतीला तिचा मित्र प्रोपोज करणार याचा, आणि अरुंधती त्याचा स्वीकार करणार आहे. त्यामुळे अनिरुद्ध टेन्शन मध्ये येत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !