Headlines

आई कुठे काय करते मालिकेतील संजना या कारणामुळे दिसणार या नवीन रूपात, जाणून घ्या !

आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

रुपालीने हा लूक नेमका कश्यासाठी केला आहे याची तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या फोटोमागचं खरं रहस्य आता समोर आलं आहे. रुपालीचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यामध्ये.

अशी ही बनवाबनवी सिनेमातील हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर रुपाली परफॉर्म करणार आहे. याच परफॉर्मन्साठी रुपालीने सुप्रिया पिळगावकर यांच्या सिनेमातील लुकशी मिळताजुळता लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.


या परफॉर्मन्ससाठी रुपाली अतिशय उत्सुक असून असा हटके प्रयोग तिने पहिल्यांदाच केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधानसोबत रुपाली या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसेल.

तेव्हा रुपालीचा हा हटके अंदाज पाहायचा असेल तर नक्की पाहा प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२ रविवार १६ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चर वाहिनीवर.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !