Headlines

‘चंद्रा’ गाण्यामुळे व्हायरल झालेल्या अहमदनगरच्या जयेशची मोठी झेप, थेट अजय-अतुल यांनी दिली मोठी संधी !

सोशल मीडियामुळे जग जवळ येऊ लागले आहे. देशातील कानाकोपऱ्यातील टॅलेण्ट या सोशल मीडियामुळे समोर येऊ लागले आहे. असेच काहीसे शिर्डीजवळील राहुरीपासून ३० किमीवर असलेल्या एका गावात राहणाऱ्या छोट्या जयेशसोबत घडले.

काही दिवसांपूर्वी जयेशने शाळेत गायलेले चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा हे गाणे युट्यूबवर खूप व्हायरल झाले. ते इतके व्हायरल झाले की ते थेट सुप्रसिद्ध गायक अजय-अतुलपर्यंत पोहचले. मुख्य म्हणजे योगायोग असा की अजय-अतुल त्यावेळी जयेश सारख्या आवाजाच्या शोधात होते. त्याचवेळी त्यांनी तो व्हिडिओ पाहिला. आणि त्याला त्यांच्या आगामी चित्रपटातील गाण्यासाठी निवडले.

शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर रोजी सुरु झाले. त्यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहिर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात शाहीर साबळेंच्या बालपणापासूनचे प्रसंग दाखवण्यात येणार असल्याने अजय-अतुल छोट्या शाहीर साबळेंच्या आवाजाच्या शोधात होते. पण जयेशच्या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांना तो सापडला. जयेशला अजय-अतुल यांनी त्यांच्या आगामी ‘ महाराष्ट्र शाहीर ‘ या चित्रपटात गायची संधी दिली आहे. त्यासाठी ते त्याला मुंबईत घेऊन आले आणि त्याच्याकडून २ दिवस सरावही करून घेतला.

जयेशने हे गाणे खूपच उत्तम गायल्याचे या सिनेमाचे दिग्दर्शक आणि शाहीर साबळेंचे नातू केदार शिंदे यांनी सांगितले. हे गाणे यशराज स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित केले गेले आहे. तो भव्यदिव्य स्टुडिओ पाहून छोटा जयेश थोडा बावरला होता. पण त्याने त्याचे गाणे १०० टक्के दिले. त्या गाण्याच्या सरावाची अजय अतुलची मेहनतसुद्धा दिसून येते असे केदार शिंदे यांनी सांगितले.

जयेश सर्वसामान्य घरातील सहावीत शिकणारा मुलगा आहे. त्याचे वडील एका ऑर्केस्ट्रामध्ये कि-बोर्ड वाजवतात. मात्र वर्षातील सहा महिनेच त्यांना याठिकाणी काम मिळते, इतर दिवस ते शेतमजुरी करून घरखर्च आणि जयेशच्या शिक्षणाचा खर्च भागवतात.जयेशची आवड लक्षात घेता ते त्याला नेहमीच प्रोत्साहन देतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)


‘महाराष्ट्र शाहीर’ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळेंचे नातू केदार शिंदे करत आहेत तर या सिनेमात या शाहीरांच्या पत्नीच्या भूमिकेत केदार यांची मुलगी सना दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !