अभिनेत्री केतकी चितळे ही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या बेताल वागण्यामुळे, किंवा सेटवर एखाद्याशी न पटल्यामुळे , तिच्या आजारपणमुळे, राहत असलेल्या सोसायटीत शेजारच्यांशी भांडल्यामुळे आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे. इतर प्रकरणात तिला फारसे कोणी महत्व दिले नसले तरी शरद पवारांशी पंगा घेतल्यावर ती पुरतीच अडकली. या प्रकरणामुळे ती १५ मेपासून तुरुंगाची हवा खात आहे. आता केतकीने स्वताच्या सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्याचे झाले असे की, अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवारांविरोधात एक अपमानजनक पोस्ट तिच्या फेसबुकवर पोस्ट केली. ती पोस्ट पाहून संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली.
स्वबचावासाठी केतकीने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन तिला अटक केल्याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी करावी अशी विनंती केली. तसेच तिने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा बंग केल्याचा प्रतिआरोपसुद्धा केला आहे. अनेक पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारींच्या आधारे दाखल करून घेण्यात आलेले सर्व एफआयआर बेकायदा आहेत आणि माझ्यावर झालेली अटक कारवाईही बेकायदा आहे. असा मुंबई उच्च न्यायालयाकडे दिलेल्या याचिकेत तिनं दावा केला आहे.
शिवाय मी पोस्ट केलेल्या एकाच कवितेबद्दल राज्यभरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत एफआयआर दाखल करायला लावून आणि पोलिस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. माझ्यावर एकामागोमाग अनेक पोलिस ठाण्यांतील पोलिसांकडून अटक कारवाई होऊन कायद्याचा व सत्तेचा गैरवापर होण्याचीही भीती आहे, असे तिनं याचिकेत मांडले आहे.
यावेळी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग झाला असून त्यासाठी मला नुकसान भरपाई द्यावी अशी विनवणी केतकीने याचिकेद्वारे केली आहे. केतकी तिच्या जामीनासाठीसुद्धा अतोनात प्रयत्न करत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !