Headlines

मराठी मनोरंजन श्रुष्टी हादरली, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या अभिनेत्याचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखत निधन !

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर्षी जगाचा निरोप घेतला आता या यादीत आणखी एका कलाकारचे नाव सहभागी झाले आहे. मराठी कलाकार अरविंद धनू यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक निघून जाण्याने मराठी सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून अरविंद यांना प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेत त्यांनी शालिनीच्या वडिलांचे पात्र साकारले होते.

अरविंद सोमवारी 25 जुलैला ते एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा अचानक त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास व्हायला लागला तेव्हा त्यांना तातडीने रुग्णलयात नेण्यात आले. समोर आलेल्या अहवालात त्यांना ब्रे’न स्ट्रो’क’चा झटका आल्याचे बोलले जाते. रुग्णालयात नेल्यावर काही वेळातच त्यांचे निधन झाले.


अरविंद यांचे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील शालिनीच्या वडिलांचे खलनायकाचे पात्र गाजले. याव्यतिरिक्त त्यांनी लेक माझी लाडकी, क्राइम पेट्रोलया मालिकांमध्येही काम केले आहे. एक होत्या वाल्या या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले होते.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे.त्यांच्यावर मुंबईतील माहिम येथील स्मशानभूमीत त्यांच्या कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारही उपस्थित होते.

त्यांच्या जाण्याने मनोरंजन श्रुष्टीतील कमी भरून काढणे कठीण आहे. आमच्या बॉलिरिपोर्ट टीम कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आपणही आपली श्रद्धांजली कमेंट्स मध्ये लिहू शकता. त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !