मराठी कलाकार हिंदी सृष्टीतही आपल्या अभिनयाची चुणक दाखवतात ही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही. माधुरी दिक्षित, उर्मिला मातोंडकर, पद्मिनी कोल्हापुरे, सचिन खेडेकर, लक्ष्मिकांत बेर्डे अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. यामध्ये आता आणखी एक नाव सहभागी झालं ते म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर.
मराठी मालिकांपासून सुरु झालेला सईचा प्रवास आता बॉलिवूडमध्ये देखील यशस्वी घोडदौड करत आहे. सईला नुकतेच इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच ‘आयफा’पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यामुळे सईची सर्वत्र चर्चा होत आहे.
सध्या सर्वच कलाकर बिंधास्त झाले आहे. एखाद्या विषयावर परखडपणे मत मांडायला ते कचरत नाहीत. त्यामुळे ते अधिक चर्चेत येतात. अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकताच तिच्या अंर्तवस्त्रांबाबत एक धक्कादायक खुलासा केला.
सईची मैत्रीण अभिनेत्री मालीनी अग्रवाल ने तिच्या इन्स्टाग्रामवर एकक रिल शेअर केली. त्यात तिने ‘तुम्ही तुमची आवडती ब्रा का धुत नाही?’ असा प्रश्न विचारला. यावर सईने “मला बरं वाटतं, खूप मजा येते.”असा डायलॉग मारला.
View this post on Instagram
काही महिन्यांपुर्वी प्रदर्शित झालेल्या मिमी या चित्रपटातून सईने हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. क्रिती सेनॉनने या चित्रपटात प्रमुख भुमिका साकारली होती. तर सईने सहाय्यक भुमिका साकारली. एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट आई होण्यासाठी तिला विचारण्यात येते. यासाठी तिला २० लाख रुपये देण्यात येणार असतात. मात्र, काही महिन्यांनंतर ते जोडपं त्यांना ते बाळ नको असे सांगतात. मात्र, क्रिती गर्भपात करण्यासाठी तयार नसते, यानंतर पुढे काय काय होते, यावर ही कथा अवलंबून आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !