Headlines

लग्नाआधीच राणादा आणि पाठक बाईचं बिनसलं, रस्त्यावरच भांडणं, पहा व्हिडीओ !

मालिका विश्वातील प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणजे राणदा आणि पाठक बाई. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून पुढे आलेली ही जोडी प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरली. यांनी आता एकमेकांना खऱ्या आयुष्यातही एकमेकांचा जोडीदार म्हणून स्विकार केला आहे.

त्यामुळे त्यांचे चाहते भलतेच खुश आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानंतर दोघांनी अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली होती.

आता हे दोघे लग्नाआधीच लंडन फिरायला गेल्याच्या चर्चा होते होत्या. या चर्चा जरी खऱ्या असल्या तरी तिथे ते दोघेच नसून मराठी इंडस्ट्रीतील इतर काही कलाकार असल्याचे एक व्हिडीओतून समोर आले आहे.

सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या कंटेटने रिल्स बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. अशातच लंडनला राणादा , अंजली भाई आणि लागीर झालं जी मधल्या अज्याने एक रिल तयार केली आहे.

या विनोदी व्हिडिओमध्ये हार्दिक नितीशशी बोलताना म्हणतो, “भाई, पितळ्याला घासून त्याचं कधी सोनं नाही बनत” त्यावर नितीश त्याला असं का विचारतो आहेस असा प्रश्न करतो त्यावर हार्दिक सांगतो, “यासाठी सांगतोय कारण माझी बायको ब्युटी पार्लरमध्ये गेलीये” असं म्हणत असतानाच

 

View this post on Instagram

 

A post shared by Nitish Chavan (@nitish__chavan)


अंजलीबाईंची एंट्री होते आणि अक्षया हार्दिकचा चांगला समाचार घेताना दिसते. लग्नाआधीच हार्दिकची कॉलर पकडून अक्षया दम देताना दिसत असल्याचं पाहून चाहत्यांना हसू आवरणं कठीण झालं आहे.

तिघांच्या या भन्नाट व्हिडिओवर चाहत्यांनी मजेदार कमेंट केल्या आहेत. एका युजरने पाठक बाईंनी दोघांची चांगलीच धुलाई केली असणार असे म्हटले आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी 3 मे ला साखरपुडा केला होता. सध्या त्यांची लगीन घाई सुरु असून ते पुण्यात लग्न करणार असल्याचे बोलले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !