मराठी चित्रपटसृष्टीत सैराट या सिनेमाने नवा इतिहास घडवला. या चित्रपटाची कथा, वास्तविक वाटणारे संवाद, लोकेशन, कलाकार यांनी प्रेक्षकांच्या मनात विशिष्ठ स्थान मिळवले. हा चित्रपट जरी एका प्रेमकथेवर अवलंबुन असला तरी त्यात मैत्रीचे सुद्धा चांगले दर्शन घडवले होते. परश्या, सल्या, लंगड्या यांच्या जिवाभावाच्या मैत्री सोबत आर्ची आणि तिची मैत्रीण आनीची मैत्रीसुद्धा प्रेक्षकांना आवडली होती. विशेष म्हणजे या सर्व कलाकारांना कोणतीच अभिनयाची पार्श्वभुमी नव्हती तरीही त्यांनी या चित्रपटात कमालीचा अभिनय केल्यामुळे या चित्रपटाचे विशेष कौतुक झाले.
या चित्रपटानंतर त्यातील कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाल्याचे आपण पाहिले. त्यांनी नंतर आणखी काही प्रोजेक्टमध्ये सुद्धा काम केले. पण आर्चीची जीवाभावाची मैत्रीण आनी म्हणजेच खऱ्या आयुष्यातली अनुजा मुळे ही कुठे दिसली नाही. पण ती सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिच्या आयुष्यात काय चालले आहे हे तिच्या चाहात्यांना समजण्यास मदत होते.
काही दिवसांपुर्वी अनुजाने सोशल मीडियावर आस्क मी नाऊचे सेशन घेतले होते. त्यावेळी तिने सोशल मीडिया युजर्ससोबत प्रश्न उत्तरांचा खेळ खेळला. त्यावेळी एका युजरने तिला तु सध्या काय करते हा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने वकिलांच्या कपड्यातील एक फोटो पोस्ट करत वकिली असे उत्तर दिले. तर एकाने तिला विचारलं कि तुझं शिक्षण किती झालयं त्यावर तिने नुकतीच वकिलीत मास्टर पदवी मिळवल्याचे सांगितलं.
या चित्रपटातील तिचे इतर सहकलाकार सैराटनंतर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दिसले होते मात्र अनुजाने अभिनय क्षेत्राव्यतिरीक्त एक वेगळा मार्ग निवडला व स्वताचे करीयर घडवले. सैराट या चित्रपटातले सगळे कलाकार हे लोकल आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच.
शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे नेहमीच त्यांच्या चित्रपटात नवख्या कलाकारांना घडवुन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात. सैराटसाठी सुद्धा जेव्हा कलाकांरांची निवड केली जात होती तेव्हा अनुजाला त्यांना चिठ्ठी या एकांकित पाहिले होते. त्यानंतर तिला सैराटसाठी निवडण्यात आले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !