Headlines

‘ती सध्या काय करते’ चित्रपटातली ‘आर्या आंबेकर’ काय करतेय सध्या, जाणून घ्या !

मित्रांनो कोरोनावायरस मुळे घरात बसून बोअर झाला असाल तर तुमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आलो आहोत. बातमी आहे आर्या आंबेकर बद्दल. आर्या आंबेकर ला तुम्ही ओळखतच असाल आणि तुमच्यापैकी कित्तेक जण तिचे चाहते ही असाल.
आर्या पहिल्यांदा झी मराठीवरच्या सारेगामापा लिटील चॅम्प्स स्पर्धेत सहभागी झाली होती. तिच्या सुरेल आवाजाने अख्या महाराष्ट्राचं मन जिंकत ती फायनल ला सुद्धा पोहोचली. पण सारेगामापा लिटिल चॅम्प्स स्पर्धेचा पहिला भाग जिंकला तो कार्तिकी गायकवाडने, पण महाराष्ट्रासाठी तिघेही स्पर्धक विंनर्स होते.
ह्या स्पर्धेचा पहिला भाग फारच गाजला होता. आणि आर्या सुद्धा ह्या शो मुळे घराघरात पोचली होती. ह्या स्पर्धेमध्ये तिला “प्रिटी यंग गर्ल आर्य आंबेकर” नावाने हाक मारायचे.आर्याला गायनाचे बाळकडू तिच्या घरातूनच मिळाले. आर्याने वयाच्या साडे पाच वर्षांपासून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती.
तिची आई श्रुती आंबेकर गायिका आहेत. आर्याचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे तरीही तिची मराठी उच्चारांवरची पकड खूप चांगली आहे हे तिच्या गायिकीतुन दिसून येते. आर्याचा जन्म नागपुरात झाला असला तरी ती मूळची पुण्याची आहे. आर्याने तिची पदवीचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज मधून घेतले आहे.
कॉलेज पूर्ण केल्यानंतर तिने मुंबईच्या साऊंड आयडियाज अकॅडमी मधून साउंड इंजिनीरिंग चे प्रशिक्षण घेतले. आर्याने जय हरी विठ्ठल, गरजती सह्याद्रीचे कडे, मला म्हणतात आर्या आंबेकर, आठवा स्वर, माझ्या मातीचे गायन- कुसुमाग्रज प्रतिष्टान आणि आनंदवन आले घरी- श्री बाबा आमटे. ही सुपरहिट गाणी गायली आहेत.
तिने “लेट्स गो बॅक” आणि “बालगंधर्व” ह्या चित्रपटांमध्ये सुद्धा गाणी गायली आहेत. तिने झी मराठी वरची लोकप्रिय मालिका “दिल दोस्ती दुनियादारी”, तुला पाहते रे, माझा होशील ना चे टायटल ट्रॅक ही गायले आहे. खूप कमी वयातच तिला “हरिभाऊ साठे अवॉर्ड” आणि “वसंतराव देशपांडे पुरस्कार” मिळाला आहे.
आर्याने गायनासोबतच अभिनयाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले. तिने अभिनयाची सुरवात “ती सध्या काय करते” ह्या चित्रपटापासून केली. ह्या चित्रपटामध्ये तिची मुख्य भूमिका होती. ह्या चित्रपटामध्ये तिने अभिनयाबरोबरच गायनही केले आहे. तिला ह्या चित्रपटासाठी महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? झी टॉकीज आणि सिटी सिने अवॉर्ड्स चा “बेस्ट फिमेल सिंगर” आणि “बेस्ट ऍक्टिंग पदार्पण” चा किताब मिळाला आहे. तसेच तिला ह्याच चित्रपटासाठी झी चित्र गौरव चा “मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर” चा पुरस्कारही मिळाला आहे.
आर्या सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह असते. ती तिचे अनेक फोटो नियमित पोस्ट करत असते. हल्लीच तिने रामनवमीनिमित्त एक फोटो पोस्ट केला आहे त्यात दिलेल्या कॅप्शन मधून सांगते कि तिने घरीच एक रामनवमी निम्मित एक गाणे रेकॉर्ड केले आहे जे आर्याने स्वतःच गायले आणि मिक्स केले आहे.
तिने गाण्याची लिंक लिंक तिच्या इंस्टाग्राम पोस्ट वर दिली आहे. त्या पोस्ट वर तिला आता पर्यंत ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर सध्या ९ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून तिने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी “PM Cares fund” मध्ये काही रक्कम डोनेट केली आहे. ह्याचा स्क्रीनशॉट तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर टाकला आहे. आर्याचे फॅन असाल तर तिला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका.
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *