मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीवर “जीव झाला येडापिसा” ह्या मालिकेतील शिवा आणि सिद्धी ची जोडी तुम्हाला माहितीच असेल. ह्या मालिकेतील सिद्धी म्हणजेच विदुला चौगुले आणि शिवा म्हणजे अशोक फलदेसाई हे चांगलेच लोकप्रिय ठरले होते. कलर्स मराठीवर ही मालिका आजही सुरु आहे.
ह्या मालिकेची पार्श्वभूमी ग्रामीण भागातील दाखवण्यात आली असून कथा चिन्मय मांडलेकर ह्यांनी लिहिली आहे. कथा ग्रामीण भागात घडत असली तरी ह्या मालिकेतील कलाकार विदुला आणि अशोक खऱ्या आयुष्यात खूप मॉडर्न आहेत. आज आम्ही तुम्हाला विदुला आणि अशोक बद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.
सिद्धी म्हणजेच विदुला हि मूळची कोल्हापूरची असून तिने कोल्हापूरच्याच हनुमंतराव चाटे शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे. तिची जन्मतारीख ०७ डिसेंबर २००२ आहे. विदुला तिसरीत असल्यापासूनच अभिनयाचे धडे घेत होती. तिला तिचा पहिला ब्रेक “जीव झाला येडा पिसा” ह्या मालिकेतून मिळाला.
इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे विदुला तेव्हा दहावीत शिकत होती तेव्हा तिला ह्या मालिकेची ऑफर आली होती. विदुलाला एक मोठी बहीण आहे, तीच वैदेही नाव आहे. तिने पाच वर्ष आर्किटेक्चर चे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियाला जाऊन मास्टर्स केले आहे.
विदुला तेव्हा कोल्हापूरच्याच शिंदे थिएटर अकॅडमी मध्ये शिकत होती. इथे शिकत असतानाच तिने अनेक बालकलाकारांच्या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पुरस्कार मिळवले. तिने शोभा फिल्म प्रोडक्शन च्या “डाग” ह्या शॉर्टफिल्म मधेही काम केले आहे.
शिवा म्हणजेच अशोक मूळचा गोव्याचा असून त्याचे शिक्षणही गोव्यात मरिनाच्या सरकारी शाळेत झाले आहे. तो सध्या मुंबईत त्याच्या कामानिमित्त राहतो. त्याने अभिनयाचे शिक्षण “हनुस थिएटर ट्रेनिंग सेंटर ड्रमा स्कूल” मधून घेतले आहे. तसेच अशोकने पुण्याच्या ललित कला केंद्र येथून थिएटर मध्ये मास्टर्स ऑफ आर्टस् केले आहे. तसेच अशोकने त्याच्या कॉलेज दिवसांमध्ये अनेक नाटकं आणि एकांकिकांमध्ये काम केले आहे.
हे वाचा – मृणाल दुसानिस काय करतेय आता, काय करतो नवरा, ते का राहतात वेगळे, जाणून घ्या !अशोकने नॅशनल माईम फेस्टिवल मध्येही भाग घेतला होता जे “इंडियन माईम थिएटर” आणि “मिनिस्ट्री ऑफ कल्चर” ह्यांनी एकत्रित पणे आयोजित केले होते. थिएटर मध्ये भरपूर काम केल्यानंतर त्याला त्याचा पहिला ब्रेक २०१९ मध्ये कलर्स मराठीवर “जीव झाला येडा पिसा” ह्या मालिकेमध्ये मिळाला. विदुला आणि अशोक दोघांचाही हा पहिला ब्रेक होता.
हे वाचा – ह्या दिग्गज फिल्मी घराण्यातील अभिनेत्री सोबत प्रभास लग्न करणार असल्याच्या चर्चा ? पण ..विदुला आणि अशोक बद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी –
१) विदुला ची उंची पाच फूट सहा इंच आहे. २) विदुला मालिकेच्या व्यस्त शेड्युल मुले दहावीची बोर्ड परीक्षा देऊ शकली नव्हती. पण तिने जुलै मध्ये परीक्षेला बसत ही परीक्षा क्लीयर केली. ३) तिने CCRT (Center for Cultural Resources & Training) ची राज्यस्तरीय स्कॉलरशिप मिळवली आहे. ४) तिने खूप कमी कालावधीत इंस्टाग्राम वर १ लाख फॉलोअर्स मिळवले आहेत.
हे वाचा – बॉलिवुड मध्ये अभिनेत्री बनण्यासाठी काय परिस्थिती मधून जावे लागले ऐका अभिनेत्रींच्याच तोंडून !५) तिला तिच्या कामाव्यतिरिक्त डान्स आणि स्विमिंग करायला खूप आवडतं. ६) अशोक ला ह्या मालिकेसाठी ८ किलो वजन वाढवावे लागले होते. ७) अशोकला फिटनेस ची आवड आहे. ह्रितिक रोशन त्याचा फिटनेस मॉडेल आहे.
लेख आवडला असल्यास लाईक आणि शेयर करायला विसरू नका तसेच तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
हे वाचा – ‘ती सध्या काय करते’ चित्रपटातली ‘आर्या आंबेकर’ काय करतेय सध्या, जाणून घ्या !
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !