Headlines

पवार साहेबांवरती आक्षेपार्ह्य पोस्ट केल्यामुळे ब्लॉक झालेले केतकीचे फेसबुक अकाउंट सुरु होताच केतकीने केली परत हि पोस्ट, बघा !

सतत मीडियाच्या हायलाईटमध्ये राहणारी अभिनेत्री केतकी चितळे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिला सोशल मीडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अटक केले होते. शिवाय या प्रकारामुळे तिच्याकडून तिचा सोशल मीडियाचा अॅक्सेस काढून घेण्यात आला होता. पण आता तो तिला पुन्हा मिळाला आहे.

केतकीने यांसंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले की, मला फायनली माझं फेसबुक अॅक्सेस मिळालं. सध्याच्या घडीला का होईना ते पुन्हा मिळालं आहे याचं समाधान आहे. केतकीची ही पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली असून त्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडत आहे. कमेंटमध्ये काहींनी केतकीला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी केतकीने राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एक आक्षेपार्ह कविता पोस्ट केली होती. त्यामुळे ती तिला पोलिसांनी अटक केली होती. तसेच तिच्यावर अनेकांनी टीकांची सुमने सुद्धा उधळलेली. महिनाभर पोलिस कोठडीत राहिल्यावर सुद्धा तिच्यात काहीच बदल झाले नाही.

बाहेर येऊनही ती वेगवेगळी विधाने करतच होती. तसेच तुरुंगाबाहेर पडल्यावर तिने जेलमध्ये असताना तिच्यावर लैं’गि’क अ’त्या’चा’र झाल्याचा सुद्धा आरोप केला. केतकी अनेकदा आपल्या स्वभावामुळे वेगवेगळे वाद स्वताच्या अंगावर ओढवून घेत असते. त्यावेळी ती येणाऱ्या संकटांचा विचार करत नाही. तिला केवळ आपले मत सर्वांसमोर मांडायचे असते.


त्यामुळे फेसबुकचे अॅक्सेस पुन्हा मिळाल्यावर केतकी आता कोणते नवे उपदव्याप करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केतकी सध्या जामीनावर बाहेर असून तिच्यावर पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट शेयर केल्याप्रकरणीचा आरोप आहे. ते प्रकरण अद्याप मार्गी लागले नसून तिच्यावर 22 गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील दोन गुन्हे अमान्य असल्याचे तिने सांगितले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !