कोरोना च्या संक्रमणामुळे लोक घराबाहेर पडून तो अजून पसरू नये यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन केला आहे. या लॉक डाऊन मध्ये लोकांच्या विरंगुळ्यासाठी ८० च्या दशकातील सुप्रसिद्ध मालिका रामायण ही पुन्हा प्रक्षेपित केले जात आहे. ही मालिका रामानंद सागर यांनी निर्मित केली होती.
ही मालिका आल्यानंतर लोक या मालिकेतील पात्रांना खरेखुरे देव मानू लागतील असे रामानंद सागर यांच्या ध्यानीमनी सुद्धा आले नव्हते. आज आम्ही तुम्हाला रामानंद सागर यांची माहित नसणारी गोष्ट सांगणार आहोत. रामानंद सागर यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 मध्ये झाला. रामानंद यांचे मूळ नाव चंद्रमौली चोपडा असे आहे.
रामानंद सागर यांचे आजोबा संपूर्ण कुटुंबासह पेशावर येथून कश्मीर मध्ये स्थायिक झाले. रामानंद लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि अजून एक मुलगा झाला त्याचे नाव विधू विनोद चोपडा असे आहे. विधू विनोद चोप्रा हेसुद्धा त्यांच्या भावा सारखेच म्हणजेच रामानंद सागर यांच्या सारखे एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहेत.
हे वाचा – ३० वर्षानंतर रामायणातील लव कुश कुठे असतील? एक बनला अभिनेता तर दुसऱ्याने स्वीकारला नवीन मार्ग !
रामानंद सागर यांचे शिक्षण लाहोर येथे झाले. ते संस्कृत आणि फार्सी भाषेत गोल्ड मेडलिस्ट होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर लाहोर येथून प्रकाशित होणाऱ्या डेली मिलाप मध्ये संपादकीय विभागात काम करण्यास सुरुवात केले. भारत-पाकिस्तान वाटणी नंतर रामानंद सागर यांचा परिवार मुंबईत आला. मुंबईत जीवनाचा गाडा चालवण्यासाठी ट्रक क्लीनर पासून ते शिपायाची सुद्धा नोकरी केली.
पण रामानंद सागर यांना अवगत असलेली लेखनाची कला त्यांना चित्रपटांकडे खेचत घेऊन आले. लाहोर येथून सुरू झालेला त्यांचा चित्रपटांचा प्रवास मुंबईत येऊन पूर्ण झाला. राज कपूरच्या बरसात या चित्रपटाचे लेखन करून त्यांना प्रसिद्धी मिळाली.
हे वाचा – दारासिंह यांना अशा प्रकारे मिळाला हनुमानाचा रोल, मुलगा विंदू सिंह याने सांगितली कहाणी !
रामायण मालिकेचा भरगोस यशा आधी रामानंद सागर यांनी एका चित्रपटाला दिग्दर्शित केले होते. आरजू , चरस आणि राजकुमार हे त्यांचे सुपरहिट चित्रपट ठरले. एवढे असून सुद्धा चित्रपट समीक्षकांचे त्यांच्याकडे हवे तसे लक्ष गेलेले नाही. पण त्यांनी रामायणा सारखी मालिका बनवून स्वतः सोबत त्या मालिकेत काम करणाऱ्या सर्व कलाकारांच्या भूमिका अजरामर केल्या.
हे वाचा – रामायण सिरीयल मधील शूर्पणखाचे नाक कापते वेळी सेटवर झाला होता हा गमतीदार किस्सा !
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !