Headlines

जान्हवी कपूरचा आज वाढदिवस, तिचे या ५ व्यक्तीसोबत प्रेम असल्याची चर्चा, जाणून घ्या कोण आहेत ते !

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज २६ वा वाढदिवस आहे. आपल्या कुटुंबाच्या पावलावर पाऊल टाकत जान्हवीने सुद्धा ती कशी अभिनयात सर्रस आहे ते दाखवून दिले. आज आम्ही तुम्हाला जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त खास माहिती देणार आहोत. जी तिच्या वैयक्तिक आय़ुष्याशी संबंधित आहे. बॉलिवूड म्हटले की प्रेमप्रकरण हे येतेच. अभिनेत्री जान्हवी कपूर सुद्धा तिच्या प्रेमप्रकरणांमुळे खूप चर्चेत असते, मात्र तिने याबाबत कधीच उघडपणे काही सांगितले नाही. पण तिचे बऱ्याच जणांशी नाव जोडले गेले आहे.

अक्षत रंजन – मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे नाव अक्षत रंजनसोबत जोडले गेले होते. त्यांच्या अफेअरची बातमी अनेकदा व्हायरल झाली. ते दोघे एकमेकांचे शाळेपासूनचे मित्र आहेत. या दोघांनीही कधीच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उत्तर दिले नाही.

शिखर पहाडिया – बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जान्हवी कपूरचे नाव शिखर पहाडियासोबत जोडले गेले होते. अलीकडेच पुन्हा एकदा जान्हवी कपूर शिखर पहाडियासोबत एका पार्टीत दिसली, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्या.

ओरहान अवत्रामणी – ओरहान अवत्रामणी आणि जान्हवी कपूर यांना अनेकदा एकत्र पार्टीमध्ये पाहिले जाते. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. पण एका मुलाखतीदरम्यान जान्हवी कपूरने ओरहान अवतरमणीला आपला चांगला मित्र म्हणून संबोधले.

कार्तिक आर्यन – जान्हवी कपूरचे नाव बॉलिवूडचा सध्याचा सुपरस्टार कार्तिक आर्यनसोबतही जोडले गेले आहे. या दोघांचे गोव्यात एकत्र वेळ घालवतानाचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चांवर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

ईशान खट्टर – शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर आणि जान्हवी कपूरच्या अफेअरच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. दोघेही ‘धडक’ चित्रपटात एकत्र दिसले होते. हा दोघांचाही त्यांच्या करीअरमधील पहिलाच चित्रपट होता. जान्हवी कपूरने इशानला तिचा चांगला मित्र म्हटले होते. पण इशानने कॉफी विथ करणमध्ये जान्हवीसोबतच्या ब्रेकअपचा उल्लेख केला होता.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास आज ती २६ वर्षांची झाली आहे. जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच जिम लूकमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते. जान्हवी कपूर ही सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी आहे. बोनी कपूरने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे.

जान्हवी कपूर २०२३ मध्ये वरुण धवनसोबत बवाल या चित्रपटात दिसणार आहे. या दोघांना ऑनस्क्रिन एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. जान्हवी कपूर आणि वरुण धवनचा बवाल हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.