Headlines

बॉलीवूड मधील अश्या जोड्या ज्यांनी आपल्यापेक्षा खूप छोट्या मुलीसोबत लग्न केले आहे !

बॉलिवूड कपल राहुल देव आणि मुग्धा गोडसे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. या दोघांच्या वयात एकूण १४ वर्षांचे अंतर आहे. नुकतच राहुल त्याच्या आणि मुग्धाच्या वयातील अंतरा बद्दल पहिल्यांदाच बोलला. नुकत्याच घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये राहुलने सांगितले की हे काही मोठे अंतर नाही. त्याच्या आई-वडिलांच्या वयात सुद्धा दहा वर्षांचे अंतर होते. राहुल ने सांगितले कि त्याचा आणि मुग्धाचा वयात १४ वर्षाचे अंतर आहे सुरुवातीला मला या गोष्टीची खूप चिंता वाटायची परंतु कालांतराने मला जाणवले की माझ्या आई-वडिलांच्या वयात सुद्धा दहा वर्षांचे अंतर होते. त्यामुळे हे अंतर काही इतके मोठे नाही.
माझे असे म्हणणे आहे की जर तुम्ही खुश असाल तर वयातील अंतर किंवा इतर कोणत्याही गोष्टी तुमच्यामध्ये नाही आल्या पाहिजेत. मुग्धा आणि राहुल हे असे एकच कपल नाही आहे ज्यांच्या वयात अंतर आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वयामध्ये अंतर असलेल्या कपल बद्दल सांगणारा आहोत.
सैफ अली खान आणि करीना कपूर – सैफ अली खान आणि करिना कपूर यांची जोडी बॉलिवूडमध्ये एक आयडियल कपल म्हणून मानले जाते. करीना पेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान आहे. करीनाचे हे पहिलेच लग्न असून सैफचे मात्र याआधी अभिनेत्री अमृता सिंह सोबत लग्न झालेले होते. सैफचे जेव्हा पहिले लग्न होते त्यावेळी करीना फक्त दहा वर्षांची होती. एवढेच नव्हे तर ती सैफच्या पहिल्या लग्नाला सुद्धा गेली होती. त्यावेळी करीनाने सैफला काका असे संबोधन शुभेच्छा देखील दिल्या होत्या. साईटला अमृतापासून दोन मुले देखील आहेत आणि करीना पासून एक मुलगा आहे.
कमल हसन आणि सारिका – कमल हसन ने सारिका सोबत १९८८ मध्ये लग्न केले होते. कमल हसन यांनी वयाच्या ३४ वर्षी सारिका सोबत दुसरे लग्न केले होते. लग्नाच्या वेळी सारिका २८ वर्षांच्या होत्या. शिवाय लग्नाच्या आधीच सारिका गरोदर होत्या. लग्नानंतर त्यांनी श्रुती हसन ला जन्म दिला.
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया – राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्यामध्ये तीन वर्षे अफेअर होते. या दोघांनी १९७३ मध्ये लग्न केले. जेव्हा डिंपल आणि राजेश खन्ना यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होत होती तेव्हा डिंपल केवळ १६ वर्षांची होती तर राजेश खन्ना ३१ वर्षांचे होते. त्यावेळी या दोघांच्या वयामध्ये खूपच अंतर होते. डिंपलने तिच्या पहिल्या चित्रपटानंतर राजेश खन्ना यांच्या सोबत लग्न केले आणि काही काळापुरता चित्रपट सृष्टी मधून ब्रेक घेतला.
संजय दत्त आणि मान्यता दत्त – संजय दत्तचा प्रत्येक चांगल्या वाईट काळात त्याच्या पाठी त्याची पत्नी मान्यता दत्त खंबीरपणे उभी राहिलेली आपण सर्वांनीच पाहिली आहे. संजयने त्याची दुसरी पत्नी रिया पल्लवी सोबत घटस्फोट झाल्यानंतर मान्यताशी लग्न केले. मान्यता संजय दत्त पेक्षा वीस वर्षांनी लहान आहे. आता संजय दत्त आणि मान्यता ला दोन जुळी मुले आहेत. त्यात मुलाचे नाव शहरान दत्त आणि मुलीचे नाव इकार दत्त असे आहे.
कबीर बेदी आणि परवीन दोसांझ – कबीर बेदी आणि परवीन दोसांझ यांच्या वयात तब्बल 29 वर्षांचे अंतर आहे. ब्रिटिश अन अभिनेत्री असलेली परवीन आणि कबीर बेदी यांचे दहा वर्ष अफेअर होते त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. कबीरचे परवीन सोबत हे चौथे लग्न आहे. आणि विशेष म्हणजे परवीन कबीरच्या मुलीपेक्षा म्हणजेच पूजा बेदी पेक्षा चार वर्षांनी लहान आहे.
मिलिंद सोमन आणि अंकिता कुंवर – मिलिंद सोमन गेल्या वर्षी २२ एप्रिल ला अंकिता कुंवर सोबत लग्न केले. लग्नाच्या वेळी मिलिंदचे वय ५३ वर्षे होते तर अंकिता केवळ २७ वर्षांची होती. या दोघांच्या वयातील एवढ्या अंतरामुळे त्यावेळी हे दोघे चर्चेचा विषय बनले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *