Headlines

भारतातील सर्वात तरुण आणि सुंदर महिला IPS अधिकारी , पती पण आहे IAS अधिकारी !

मुलींना सौंदर्य आणि बुद्धी या दोन्ही गोष्टींची सांगड लाभलेली असते. याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. असेच एक उदाहरण म्हणजे हरियाणाची पूजा यादव. पूजाही गुजरात कॅडरची आयपीएस ऑफिसर आहे. तिचे सौंदर्य बॉलिवूड सौंदर्यवतींना फिके पाडते.

एमटेकचे शिक्षण घेतल्यावर पूजाने कॅनडा आणि जर्मनीमध्ये नोकरी केली. पूजा मुळची हरियाणाची. पण मागच्या वर्षी तिचे गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात एएसपी म्हणून पोस्टींग झाले. 20 सप्टेंबर 1988 रोजी तिचा जन्म झाला. तिने गोधारा येथील डॉ. लीना पाटील यांच्या हाताखाली आपली ट्रेनिंग घेतली. शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी ती रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करायची. तसेच मुलांची शिकवणीसुद्धा घ्यायची.

पुढे तिला विदेशात चांगल्या पगाराची नोकरी लागली पण आपल्या देशासाठी काहीतरी करुन दाखवण्याची तगमग तिला स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे ती परत भारतात आली. यूपीएससी सारख्या परीक्षेत दोनदा प्रयत्न केल्यावर तिला यश मिळाले.

पूजा यादव 2018 च्या कॅडरची आयपीएस अधिकारी आहे. तिने 18 फेब्रुवारी 2021 मध्ये आयएएस विकल्प भारद्वाजसोबत लग्न केले. विकल्प 2016 चे केरळ कॅडर आयएएस अधिकारी आहे. पूजा आणि विकल्पची ओळख मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये झाली होती. लग्नानंतर विकल्पने आपले कॅडर बदलून गुजरातला पोस्टींग केली.

आपल्या कार्यकाळात पूजाने थराद येथे 105 करोडहून जास्त अवैद्य दारुसाठा जप्त केला आहे. त्या काळी या जप्तीची खूप चर्चा झाली होती. याशिवाय तिने आपल्या कार्यकाळात गांजाची तस्करी करणाऱ्यांच्या सुद्धा मुस्क्या आवळल्या होत्या.
पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर लाखों फोलोवर्स आहेत.