भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या भारताचे वेगळेपण सांगत असतात. भारतामध्ये धर्म जात पंथ यांची विविधता आपल्याला पाहायला मिळते परंतु आज आम्ही तुम्हाला अशी एक माहिती सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाहीये. ती गोष्ट म्हणजे भारतातील रेल्वे स्टेशन बद्दल माहिती. भारताच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जाण्यासाठी अनेकदा आपण रेल्वेचा वापर करत असतो.
रेल्वेमध्ये प्रवास करत असताना वेगवेगळे स्टेशन देखील आपल्याला लागतात. रेल्वे स्टेशनच्या नावामुळे त्या जागेची त्या शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत असते परंतु आज आम्ही तुम्हाला जी माहिती देत आहोत, त्या माहितीमुळे तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होणार आहे, त्याच सोबत तुमचे मनोरंजन देखील होणार आहेत. हो, आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही विनोदी रेल्वे स्टेशनाची नावे सांगणार आहो,त ज्यांची नावे ऐकताच तुम्ही हसून वेडे व्हाल. हसून हसून तुमचे पोट दुखू लागेल, चला तर मग जाणून घेऊया या काही रेल्वे स्टेशन बद्दल अधिक माहिती.
गेल्या अनेक वर्षापासून भारतीय रेल्वेने वेगाने प्रगती केलेली आहे. देशाच्या या रेल्वेमधून दिवसाला लाखो लोक एका जागेवरून दुसऱ्या जागी प्रवास करत असतात. या प्रवासादरम्यान आपल्याला वेगवेगळे रेल्वे स्थानके लागतात. या रेल्वे स्थानकावर आपल्याला पिवळ्या रंगाचे बोर्ड देखील पाहायला मिळतात. या पिवळ्या रंगाच्या बोर्डावर रेल्वे स्टेशनचे नाव असते, या रेल्वे स्टेशन मुळे त्या जागेला स्वतःची एक ओळख प्राप्त होते. परंतु आज तुम्ही अशा काही रेल्वे स्टेशन बद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला स्वतःला वाटेल असे कोणी नाव ठेवते का? हा प्रश्न देखील तुमच्या मनामध्ये निर्माण होणार आहे. भारतातील सर्वात विनोदी रेल्वे स्टेशन पैकी पहिले नाव आहे बीवी नगर.
1. बीबीनगर रेल्वे स्टेशन – बीबीनगर नावाचे हे रेल्वे स्टेशन तेलंगणा मधील भुवाणी नगर जिल्ह्यामध्ये आहे. हे दक्षिण मध्य रेल्वे येथील विजयवाडा डिव्हिजनचे स्टेशन आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव बिवीनगर कसे पडले याबद्दल अधिकृत माहिती कुणाकडेच नाही परंतु आणि हो या रेल्वे स्टेशनचा संबंध पत्नी या नावाशी अजिबात नाही!
2. बाप रेलवे स्टेशन – हे नाव वाचताच तुम्हाला हसू आले असेल परंतु हे एका रेल्वे स्टेशनचे नाव आहे. हे राजस्थान यातील जोधपुर मधील रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक जास्त प्रसिद्ध नसले तरी या रेल्वे स्थानकाच्या नावाबद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळतात.
3. नाना रेलवे स्टेशन – या नाना नावाचे रेल्वे स्टेशन राजस्थान मध्ये आहे. हे रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी तुम्हाला सूबे येथील सिरोही पिंडवारा ठिकाणी जावे लागेल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या रेल्वे स्टेशनचे नाव नाना पाटेकर किंवा कोणत्याही नानाशी याचा काही संबंध नाही.
4. साली रेलवे स्टेशन – हे नाव ऐकताच सर्व जावयांच्या चेहऱ्यावर हसू आले असेल. जर तुम्ही तुमच्या साली साहेबांसोबत या रेल्वे स्टेशनचे दर्शन करायला जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला राजस्थान येथील जोधपूर जिल्ह्याच्या साली नावाच्या स्थानकावर जावे लागेल. हे स्टेशन उत्तर पश्चिम रेल्वेशी कनेक्टेड आहे.
5. ओढ़निया चाचा रेलवे स्टेशन – तसे पाहायला गेले तर चाचा म्हणजेच काका कधीच ओढणी घेत नाही परंतु या नावाचे रेल्वे स्टेशन अगदी वेगळे आहे. हे नाव ऐकताच तुम्हाला नक्कीच हसू आले असेल. हे रेल्वे स्थानक जोधपूर येथे वसलेले आहे. हे स्टेशन उत्तर पश्चिम रेल्वेशी कनेक्टेड आहे.
6. सहेली रेलवे स्टेशन – या रेल्वे स्टेशनवर तुम्हाला तुमच्या सहेली सोबत म्हणजेच मैत्रिणी सोबत एकदा अवश्य जायला पाहिजे, अशा वेळी तुम्ही तुमच्या घरी मी आपल्या सहेली सोबत रेल्वे स्टेशनवर जात आहे असे सांगू शकता. हे रेल्वे स्टेशन मध्यप्रदेश येतील भोपाल आणि इटारसी जवळ आहे. हे रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेच्या नागपूर डिव्हिजन अंतर्गत येते.