Headlines

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा झाला जोरात संपन्न, संपूर्ण बॉलीवूड आला होता कार्यक्रमाला !

बॉलीवूड क्षेत्रामध्ये रोज काही ना काही समारंभ साजरे होत असतात. या समारंभाला अनेक जण अगदी थाटामाटाने हजेरी देखील लावतात. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्याबद्दल एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही चर्चेचा विषय बनलेले होते.

माध्यमां समोर देखील यांनी आपले प्रेम लपवले होते परंतु आता ही वेळ आली जेव्हा या दोघांनी साखरपुडा केलेला आहे आणि म्हणूनच सगळ्यांच्या नजरा या दोघांच्या साखरपुड्यांकडे लागलेल्या होत्या. साखरपुडा झाल्यानंतर या कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो परिणीतीने आपल्या ऑफिशियल अकाउंट वरून शेअर केलेले आहेत.

परिणीती आणि राघव हे जोडपे गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांच्या चर्चेचा विषय बनलेला होता. अनेकदा हे दोघेजण कॅमेऱ्याच्या नजरेत कैद देखील झाले होते. यांच्या नात्याची सुरुवात झाली देखील होती परंतु या दोघांनीही आपल्या नात्यांवर कोणत्याही प्रकारचे भाष्य करणे टाळले होते. आज या चर्चेला पूर्णविराम लागलेला आहे. या दोघांनी आपल्या भावी संसारासाठी आवश्यक असलेले पहिले पाऊल उचलले आहे.

या साखरपुड्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या साखरपुड्या सोहळ्याला परिणीतीची बहीण प्रियंका चोप्रा देखील उपस्थित होती. प्रियंका ग्लॅमरस रूप मध्ये आपल्या कारमधून आली आणि तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या साखरपुड्याला बॉलीवूडमधील प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा देखील उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला ते 150 पाहुणे उपस्थित असल्याचे देखील सांगितले गेले. या कार्यक्रमांमध्ये दोघांच्या जवळचे असणारे नातेवाईक आप्तेष्ट मंडळी उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra


सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम आदमी पार्टीचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील या साखरपुड्याला उपस्थित होते त्याचबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील या जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. साखरपुडा झाल्यानंतर हे दोघे कधी लग्न बंधनात अडकतील याबद्दल चर्चा देखील सुरू झाली आहे, यापूर्वी परिणीती आणि राघव यांना अनेकदा एअरपोर्ट वर पाहण्यात आलेले आहे

साखरपुडा झाल्यानंतर याच वर्षी हे दोघेही लग्न करतील अशी माहिती देखील सांगण्यात आलेली आहे. लवकरच हे दोघेजण विवाह बंधनात अडकून आपल्या भाविक संसाराला सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे. अनेकांनी या दोघांना लग्नासाठी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. दोघे ही साखरपुड्यामध्ये अत्यंत सुंदर दिसत होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.