अनेकदा आपल्याला बॉलीवूडमधील अभिनेत्रीच्या बद्दल काही ना काही माहिती मिळत असते. या बॉलीवूडमधील अभिनेत्रींचे कौतुक देखील अनेकदा केले जाते. कधी कौतुक हे सुंदरतेबद्दल असते तर कधी कौतुक हे अभिनयाबद्दल असते परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याबद्दल जर तुम्ही माहिती जाणून घेतली तर त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये नक्कीच अभिमान जागा होईल. तुमची देखील नजर या अभिनेत्रीकडे बघण्याची बदलून जाईल. या अभिनेत्रींवर तुम्ही नक्कीच प्रेम करू शकता, त्यांनी केलेले कर्तृत्व जाणून तुम्हाला आनंद होईल.
या बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मुलींना दत्तक घेतलेले आहे. अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतर मुलींना दत्तक घेतले तर काहींनी लग्नाच्या पूर्वीच मुलींना दत्तक घेतलेले आहे, अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्न न करताच आई झालेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला हिंदी सिनेमा सृष्टीतील अशा काही अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, ज्यांनी अनाथ मुलींचे जीवन अगदी स्वर्ग बनवलेले आहे. या मुलींना योग्य त्या सुविधा देऊन त्यांचे जीवन उज्वल बनवलेले आहे.
सुष्मिता सेन – सर्वांची लाडकी अभिनेत्री सुष्मिता सेन यांनी दोन मुलींना दत्तक घेतले आहे आणि आतापर्यंत लग्न देखील केलेले नाही. सुष्मिता या दोन मुलींची देखभाल अगदी प्रामाणिकपणे आणि मनापासून करते. अनेकदा सोशल मीडियावर या दोन मुलींचे फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही मुली आजही सुश्मिता सोबत अगदी आनंदाने राहत आहेत.
मिस युनिव्हर्स चा किताब जिंकल्यानंतर सुष्मिता ने एक नाही तर दोन मुलींना दत्तक घेतले. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आज सुष्मिता सेन 47 वयाची असली तरी अनेकदा त्यांचे नाव वेगवेगळ्या पुरुषांसोबत जोडले जाते परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आज देखील सुष्मिता सेन कुमारिका आहेत म्हणजेच त्यांनी लग्न केलेले नाही.सुष्मिता सेन यांच्या मुलीचे नाव रिनी सेन आणि अलीशा सेन आहे.
सनी लियोन – एकेकाळी एडल्ट फिल्म इंडस्ट्री मध्ये काम केलेली अभिनेत्री सनी लियोनी आपल्या सर्वांना माहिती आहे. या अभिनेत्रीने देखील एका मुलीला दत्तक घेतलेले आहे. वर्ष 2012 मध्ये सनीने हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये आपले पहिले पाऊल टाकले आणि वर्ष 2011 मध्ये डेनियल वेबर सोबत लग्न केले लग्न केल्यानंतर दोघांना सरोगसीच्या माध्यमातून एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव अनेल सिंह वेबर आणि नेहा सिंह वेबर असे आहे. या दोन्ही मुलांच्या नंतर सनी आणि डेनियल यांनी मुलगी दत्तक घेतली तिचे नाव निशा सिंह वेबर आहे.
रविना टंडन – अभिनेत्री रविना टंडन ने लग्न करण्यापूर्वी वयाच्या 21 व्या वर्षीच पूजा आणि छाया नावाच्या दोन मुलींना दत्तक घेतले होते. रवीनाच्या एका मुलीचे लग्न देखील झाले आहे आणि रवीना आई देखील बनली आहे रवीनाने अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केले होते. रवीना आणि अनिल यांना एक मुलगा रणवीर आणि एक मुलगी निशा राशा थडानी आहे.
मंदिरा बेदी – मंदिरा ने दिवंगत राज कौशल यांच्यासोबत लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर दोघांना एक मुलगा देखील झाला. या मुलाचे नाव वीर आहे त्याचबरोबर लग्न झाल्यानंतर मंदिरा बेदीने एका मुलीला दत्तक घेतले होते. या मुलीचे नाव तारा बेदी कौशल आहे.
35 मुलींची आई आहे प्रीती झिंटा 34 व्या मुलीला घेतले होते दत्तक – लग्न होण्यापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा यांनी एक नाही तर तब्बल 34 मुलींना दत्तक घेतले होते. या सर्वांचा खर्च आजही प्रीती झिंटा उचलते त्याचबरोबर लग्नानंतर सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलींना प्रीतीने जन्म दिला त्यात एक मुलगा जय आणि दुसरी मुलगी जिया असे यांचे नाव आहे.