आपल्या भारतात सहजासहजी दुसरे लग्न करणे शक्य नाही हे आपण सर्वच जाणतो. कारण भारतात दुसरे लग्न करण्यासाठी कायद्याने आधी पहिल्या लग्नापासून घटस्फोट घ्यावा लागतो आणि ही घटस्फोट घेण्याची प्रक्रिया खूप मोठी असते. आपला भारत असा देश आहे की जिथे एका घरात दोन पत्नी ठेवणे किंवा दोन लग्न करणे हा गुन्हा मानला जातो. परंतु आपल्या भारत देशाव्यतिरिक्त या जगात असाही एक देश आहे जिथे दोन लग्न करणे मान्य आहे. व तेथील सरकार दोन लग्न करणाऱ्यास इनाम देते.
या जगात असे अनेक देश आहेत जिथे अशा प्रकारे लग्न करण्यास प्रोत्साहित केले जाते. अशा देशांपैकी एक देश आहे तो म्हणजे संयुक्त अरब अमीरात. हा देश जगातील सर्वात श्रीमंत देश मानला जातो कारण येथे तेलांच्या खाणीच्या खाणी सापडतात.
संयुक्त अरब अमीरात म्हणजेच युएइ या देशात जर कोणाच्या दोन पत्नी असतील तर तेथील सरकारकडून त्या व्यक्तीस इनाम स्वरूपी घर गिफ्ट देण्यात येईल अशी घोषणा केली गेली आहे. घरा व्यतिरिक्त सुद्धा अजूनही काही गोष्टी गिफ्ट म्हणून मिळू शकतात. जगात जिथे सर्वत्र दोन लग्न करण्यास पाप मानले जाते तेथे दुसरीकडे अशा प्रकारचे मुस्लिम देश स्वतःला दोन लग्न करण्यासाठी इनामे घोषित करत आहेत. असे म्हटले जाते की मुस्लिम धर्मात चार लग्न करणे मान्य आहे.
दुबई मिडीया खलिज टाईम्स ने दिलेल्या माहितीनुसार, यूएई मध्ये म्हणजेच संयुक्त अरब अमीरात मध्ये मागील काही वर्षांपासून मुलांपेक्षा मुलींची संख्या वाढली आहे. त्यामुळे अविवाहित मुलींची संख्या वाढली आहे.
मुलींची वाढती संख्या लक्षात घेता तेथील सरकारने मुलांना दुसरे लग्न करण्याचे सुचित केले आहे. ज्यामुळे मुलींचा संसार सुरु होईल. यूएई च्या बुलियादि ढांचा विकास मंत्री डॉक्टर अब्दुल्ला बेलहैफ अल नुइमी यांनी फेडरल नॅशनल कौन्सिलिंग च्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली. या गोष्टीसाठी सरकारने स्कीम सुद्धा तयार केली आहे.
यूएई च्या बुनियादी ढांचा विकास मंत्री डॉक्टर अब्दुल्ला बेलहैफ अल नूइमी यांनी या स्कीमची घोषणा करतेवेळी सांगितले की, आपल्या देशातील मंत्रालयाने असा निर्णय घेतला आहे की जो व्यक्ती दोन पत्नी करेल त्या व्यक्तीस शेख जायत हाऊसिंग कार्यक्रमा तर्फे इनाम स्वरूपी घर गिफ्ट करण्यात येईल. हे घर मुख्यतः त्या दुसऱ्या पत्नीसाठी असेल. त्याचा अर्थ पहिले लग्न केल्यावर जे घर मिळते त्यासोबतच परिवारास सरकारतर्फे दुसरे सुद्धा घर मिळेल. म्हणजे त्या व्यक्तीच दुसरे लग्न करून फायदाच होईल.
बुनियादी मंत्री अब्दुल्ला ने सांगितले की दुसऱ्या पत्नीसुद्धा पहिल्या पत्नी सारखाच दर्जा दिला जाईल. दुसऱ्या पत्नीसुद्धा पहिल्या पत्नी सारखी राहण्याची खाण्या-पिण्याची व्यवस्था असेल. अब्दुल्ला यांनी असेही सांगितले की घर देण्याच्या आश्वासनाने लोक दुसरे लग्न करण्यास प्रोत्साहित होतील. आणि देशातील अविवाहित मुलींची संख्या कमी होईल. दुसऱ्या लग्नातील पत्नीस तिचे स्वतःचे घर मिळण्याचा पूर्ण हक्क असल्यामुळे आम्ही इनाम स्वरूपी घर ठेवले.
यूएई येथील मुलींच्या वाढत्या संख्येमुळे तेथील सरकार खूप चिंतेत पडले आहे. तेथील सरकारचे असे मानणे आहे की जर दुसऱ्या लग्नाचा पर्याय काढला नाही तर देशातील खर्च खूप वाढू शकतो.
Bollywood Updates On Just One Click