बाहेर सर्वत्र संपूर्ण जग कोरोना व्हायरस शी लढा देत असताना आता भारतातील प्रसिद्ध गायक कोरोना व्हायरासच्या लढ्यात देशाला प्रेरणा देण्यासाठी पुढे सरसावले आहे. सध्या सोनू निगम स्वतः देशाच्या बाहेर दुबईमध्ये आहेत. परंतु तरी देखील त्यांना आपल्या देशाच्या भविष्याची काळजी सतावत आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता सोनू निगम यांनी त्यांचा मड आयलंड येथील बंगला कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी व त्यांची देखभाल करणाऱ्या आरोग्य संबंधित कर्मचाऱ्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनू आणि त्यांचे वडील अगम कुमार निगम यांनी संपूर्ण जगाची स्थिती पाहून आपल्या भारत देशासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.
सोनू यांनी सांगितले की, हा काळ फक्त भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठीच खूप कठीण परिस्थिती निर्माण झाल्या सारखा आहे. त्यामुळे आपल्याला जेवढी जमेल तेवढी भारत सरकारची मदत करणे आवश्यक आहे. आता चालू असलेली परिस्थिती खूपच चिंताजनक असून इटली, युके, आणि स्पेन यांसारख्या देशाची हालत बघता आपल्या भारत देशाला येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे.
आपल्या देशाची लोकसंख्या ही १३० करोड हून अधिक आहे. शिवाय आताची परिस्थिती सुद्धा खूपच नाजूक आहे. जर संपूर्ण जगात महामारीची परिस्थिती निर्माण झालीच तर आपल्याकडे हॉस्पिटलची संख्या कमी पडू शकते. या परिस्थितीशी लढा देण्यासाठी इंग्लंडने वेगळाच मार्ग अवलंबला आहे. इंग्लंड ने कोरोना बाधित रुग्णांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक किलोमीटर वर आपत्कालीन व्यवस्थापन केले आहे.
जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला पहिल्यांदा एक दिवसाचा जनता कर्फ्यु लागू केला होता त्यावेळी सोनू निगम यांनी घरी असलेल्या लोकांसाठी सोशल मीडिया द्वारे दुबईहून लाईव्ह कॉन्सर्ट केले होते. याधी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळ ठप्प केली आहे. त्यावेळी सोनू निगम दुबई मध्येच होते.
ते भारतात परतु शकत होते मात्र भारतीय आरोग्य व्यवस्थेवर आपला उगीच ताण येऊ नये यासाठी त्यांनी दुबईमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. आता सोनू निगम हे परिवारासोबत दुबईमध्ये सेल्फ आयसोलेट झाले आहेत.
Bollywood Updates On Just One Click