अनेकदा चित्रपट पाहत असताना असे काही दृश्य दिसतात की आपण विचारात पडतो हे कसं साकारला गेला असेल. खरेतर चित्रपटांमध्ये अशी जबरदस्त दृश्ये VFX या तंत्रप्रणालीचा वापर करून चित्रित केली जातात. प्रत्येक चित्रपटात असे एकतरी दृश्य असतेच जे त्या चित्रपटाला विशेष बनवते.
पण अनेकदा अशा दृश्यांचे चित्रीकरण करणे थोडे कठीण होते. अशा वेळी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. ती दृश्ये निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या पडद्यासमोर चित्रित करतात. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच थोडी माहिती देणार आहोत की कशा प्रकारे चकित केली जाणारी दृश्ये चित्रित केली जातात.
तान्हाजी – नुकताच बॉक्सऑफिस वरती हिट झालेला तान्हाजी मधील काही शूटसाठी VFXची मदत घेतली. त्यामध्ये अजय देवगण यांच्या NY VFXWAALA या कंपनीने VFX केलं आहे. त्याच पूर्ण काम प्रसाद सुतार यांनी पाहिलं आहे.
अतिशय उत्तम प्रतीचं काम या चित्रपटात पाहायला मिळालं. सुरुवातीला अगदी रेखीव हस्तकलाआयडिया बनवून त्यातून हि भव्य-दिव्यता त्यांनी साकारली. या हस्तकलेची पूर्ण जबाबदारी जर्मन टीम ने पाहिली आहे.
अगदी फक्त १० सोबत १० लोकांच्या छोट्या लढाई लावून चित्रपटातील दृश्य बनवण्यात आली आहेत. यापूर्वी या कंपनीने जग्गा जासूस, बाजीराव मस्तानी, शिवाय आणि पद्मावत, यासारख्या चित्रपटांचं VFX च काम केलं आहे. तसेच तान्हाजी चित्रपटातील अगदी सुरुवातीचे दृश्य पण भव्यतेने बनवले गेले आहे. चित्रपट पाहताना त्या सेटच्या भव्यदिव्यतेचा अनुभव येतो.
चेन्नई एक्स्प्रेस मधील ट्रेनचे दृश्य – तुम्हाला शाहरुख आणि दीपिकाचा चेन्नई एक्स्प्रेस हा चित्रपट तर माहित असेलच. ज्यामध्ये ते ट्रेन ने मुंबईला यायचा प्रवास करत होते. चित्रपटात आपल्याला अधिकतर दृश्य ट्रेन मधीलच दिसतात. मात्र वास्तविक ट्रेन मध्ये इतकी गर्दी असते की गर्दीत शूटिंग करणे खूप कठीण असते. त्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग क्रोमा या तंत्राज्ञानाचा वापर करून शूट केला गेला. या तंत्राज्ञानामुळे ट्रेन चालते आहे असे दाखवले होते मात्र वास्तविक असे नव्हते.
बाहुबली – असे बरेच कमी जण असतील ज्यांनी बाहुबली हा चित्रपट बघितला नसेल. जर तुमच्या लक्षात असेल तर या चित्रपटाच्या सुरुवातीला पाण्यामधून एक हात वर येताना दिसतो. तिथे एक लहान मुलगा असतो. पण वास्तवात तुम्हाला माहित आहे का ते काय होते ? खरे तर तंत्रज्ञानाच्या मदतीने दाखवण्यात आलेला लहान मुलगा ही एक पाण्याची बॉटल होती.
या दृश्याने प्रेक्षकांना चकित करून सोडले होते. या चित्रपटाच्या अजुन एका दृष्यात असे दिसले होते की भल्लालदेव एका सांड सोबत भिडत असतो. हे दृश्य बघून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले होते.
मात्र खरे तर त्या दृश्यात भल्लालदेव हून अधिक मेहनत बाहुबलीच्या पडद्या मागील टीम ने घेतली होती. त्यांनी कंप्युटरवर ग्राफिक्स च्या मदतीने सांड तयार करून पडद्यावर दाखवला होता. तसेच पाण्यासमोरून नाचतानाचा व्हिडीओ तुम्हाला आठवत असेल. तो असाच vfx मध्ये बनवला आहे. तसेच भव्यदिव्या पाण्यातून पोहत असतानाचा सिन पण अगदी थोड्या कमी पाण्यात शूट केला आहे. सोबत त्याचा फोटो जोडत आहे पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसेल.
किक – २०१४ मध्ये आलेल्या किक या चित्रपटात सलमान खान दिसला होता. यामध्ये सलमान खान मास्क घालून वावरायचा. या चित्रपटातील एका दृश्यात सलमान खान रेल्वे रुळावरून जात असतो तितक्यात समोरून ट्रेन येते. तेव्हा सलमान सायकल वरुन उतरून ट्रेन समोर पायी चालत जाताना दिसतो. मात्र वास्तवात तेथे कोणतीच ट्रेन नव्हती. तेथे कंप्युटर ग्राफिक्सचा वापर करून तेथे ट्रेन दाखविली होती.
Bollywood Updates On Just One Click