मित्रांनो PUBG गेम बद्दल तुम्हाला माहितीच असेल. अतिशय कमी कालावधीतच जगभरात लोकप्रिय ठरलेल्या ह्या गेम ने प्रत्येक मुलाला वेड लावले होते. पोकेमॉन गो नंतर सर्वात जास्त क्रेझ ह्याच गेम ची पाहायला मिळाली होती. पोकेमॉन गो ची लोकप्रियता काही काळानंतर कमी झाली पण PUBG ची क्रेझ आजही गेम्स खेळणाऱ्यांमध्ये अजूनही तशीच आहे. PUBG खेळणाऱ्यांची क्रेझ इतकी होती कि काही मुलं रोज १८ तास तो गेम खेळायची.
ह्या गेम च्या व्यसनी गेलेल्या मुलांचे मानसिक संतुलन बिघडून ती वेडी झाली आहेत. काही मुलांचे मोबाईल फोन्स काढून घेतल्यामुळे काहींनी आत्महत्या केली अश्याही बातम्या तुम्हाला ऐकायला आल्या असतील. गेम खेळणं हा मनोरंजनाचा भाग असला तरी तो किती वेळ खेळला पाहिजे ह्यावरही काही मर्यादा असाव्यात.
मित्रांनो तुम्ही सुद्धा PUBG गेम खेळला असाल किंवा अजूनही खेळत असाल. पण तुम्हाला माहितीये का PUBG चा फुल फॉर्म काय आहे? बऱ्याच जणांना माहित नसेल. PUBG चा फुल फॉर्म आहे “PlayerUnknown’s BattleGround”. मित्रांनो PUBG बद्दलच्या अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुम्हाला ह्या लेखातून सांगणार आहोत. हा गेम बनवला जन्माने आयरिश असलेल्या ब्रेंडन ग्रीनी ह्याने. २०१७ मध्ये हा गेम लाँच झाला होता.
तुम्हाला आता माहिती झालंच असेल कि ब्रेंडन ग्रीनी ने हा गेम बनवला पण ह्या गेम च्या बनण्यामागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ब्रेंडन स्वतः चांगला एक गेमर आहे. “द हंगर गेम्स ” ह्या पुस्तकांची मालिका वाचत असतानाच त्याला ह्या गेम ची कल्पना सुचली. पण त्याला हा गेम तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज चे दयान नव्हते. ते त्याला आधी शिकून घ्यावे लागले.
PUBG चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीच आता माहितीच झाला आहे, पण तुम्हाला माहिती आहे का? ह्या गेम ला हेच नाव मिळण्यामागे काय कारण असू शकेल? आम्ही सांगितल्या प्रमाणे ब्रेंडन स्वतः एक उत्तम गेमर आहे. तो आतापर्यंत जितके गेम खेळला आहे त्याने त्याचे नाव त्या गेम मध्ये “Player Unknown” असे ठेवले आहे. आता तुम्हीच थोडा विचार करून बघा. तर आता तुम्हाला हि कळलंच असेल PUBG हे नाव ह्या गेम ला कसं मिळालं असेल.
PUBG हा जगातला सर्वात जास्त खेळला जाणारा गेम आहे. पण तुम्हाला माहितीये? २०१७ मध्ये PUBG ने एकाच वेळी ३१ लाख ०६ हजार यूजर्स नी एकत्र येऊन खेळण्याचा नवीन रेकॉर्ड बनवला होता. आजही जवळपास २० लाख यूजर्स हा गेम एकाच वेळी खेळतात. PUBG मध्ये तुम्हाला चीटिंग करणं महागात पडू शकतं. आपला स्कोर वाढवण्यासाठी यूजर्स अनेक क्लुप्त्या लढवून चीटिंग करण्याचा प्रयत्न करतात जे गेम च्या फेअर प्ले पॉलीसि मध्ये बाधा आणत आणि इतरांच्या गेमिंग एक्सपीरिअन्स वर परिणाम होतो. PUBG मध्ये कोणत्याही प्रकारची चीटिंग केल्यास तुम्हाला १०० वर्षांसाठी बॅन करण्यात येत.
आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा. हा जगातला सर्वाधिक खेळला जाणारा गेम किती कमावतो ह्याची उत्सुकता तुम्हालाही लांगूल राहिली असेल. तर सांगतो PUBG महिन्याला ७६ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ५७७ कोटी भारतीय रुपये दर महिन्याला कमावतो. त्यामधले ७० मिलियन डॉलर्स ची कमाई रॉयल पास मधून होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
Bollywood Updates On Just One Click