असे म्हणतात की प्रेम करायला आणि लग्न करायला वयाचे बंधन नसते. परंतु आपल्याकडे पती पत्नीच्या वयात पतीचे वय अधिक आणि पत्नीचे त्याच्याहून कमी असल्यास ते फायदेशीर असते असे म्हंटले जाते. अशा प्रकारे वयाचे कॉम्बिनेशन असल्यास वैवाहिक जीवन सुखकर जाते असे म्हणतात. ते कशा प्रकारचे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जास्त वयाचे पुरुष हे कमी वयाच्या पत्नीपेक्षा तुलनेने जास्त समजदार असतात. ते त्यांच्या जोडीदाराची आवड नावड योग्यरीत्या ओळखू शकतात. त्यांना लहान लहान गोष्टींवरून लगेच राग येत नाही. यामुळे त्यांचे त्यांच्या जोडीदारासोबत भांडण होण्याची शक्यता कमी असते. सोबतच अशा प्रकारच्या नात्यात मिसअंडरस्टँडिंग सुद्धा जास्त होत नाही. त्यामुळे त्यांचे नाते मजबूत होते.
कमी वयाच्या मुलांत स्वतः ची ओळख किंवा मुलींवरून इंसिक्योरिटी असते. त्यांना नेहमीच असे वाटते की त्यांची पत्नी त्यांच्या हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे ते नेहमी त्यांच्या पत्नीस कंट्रोल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मध्ये जर पत्नी अधिक कमाई करणारी असेल तरी सुद्धा त्यांना ते सहन होत नाही. ते त्यांच्या नात्याला मजबूत बांधू शकत नाही. पण वयाने अधिक असलेल्या पुरुषांच्या बाबतीत ही समस्या उद्भवत नाही. कारण ते या बाबतीत खूप समजदार असतात.
अधिक वयाचे पुरुष हे त्यांच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर नाही तर त्यांच्या मनावर प्रेम करतात. कमी वयाचे पुरुष हे अधिकतर मुलींच्या सौंदर्यावर आकर्षित होतात. आणि मग लग्नाचा निर्णय घेतात. तुलनेत अधिक वयाचे पुरुष हे मुलीचे मन आणि व्यवहार बघतात. त्यामुळे त्यांचे नाते घट्ट असते.
घराची आर्थिक स्थिती स्थिर कशी ठेवावी हे अधिक वयाच्या पुरुषांना नीट समजते. ते अधिक खर्चिक स्वभावाचे नसतात. त्यांना पैशांचे मूल्य ठाऊक असते. त्यामुळे ते पैशांचा कारभार योग्य रीतीने सांभाळू शकतात. तर कमी वयाचे पुरुष हे शो बाजी मध्ये पैसे उधळतात त्यामुळे घरची अर्थित स्थिती ढासळते.
अधिक वय असलेल्या मुलांचे त्यांच्या जोडीदारां बाबतीत एक मत स्पष्ट असते की ते त्यांची पत्नी, लग्न, आणि आयुष्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवतात. तर तुलनेत कमी वयाच्या पुरुषांचे मन हे सारखे भरकटत असते. त्यांच्या मनात आयुषाबद्दलची स्पष्टता आलेली नसते. त्यामुळे पुढे जाऊन नाते कमजोर होण्याची शक्यता असते. वयात अंतर असल्यास पती पत्नी दोघेही एकमेकांना मान सन्मान देतात.
पती वयाने मोठा असल्यास आपल्या पत्नीस लहान मूल समजून तिच्या चुका माफ करतो. तर पत्नी सुद्धा पती वयाने मोठा असल्याने त्यांना योग्य तो मान देते. मात्र पती पत्नी वयाने सारखे असतील तर त्यांच्यात इगो प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यांच्यात एकमेकांची इज्जत करणे किंवा एकमेकांना मान देणे या गोष्टी बघितल्या जात नाहीत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
Bollywood Updates On Just One Click