Headlines

चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर फी परत करून देतात हे सुपरस्टार्स, एकाने तर परत केले होते ६५ कोटी रुपये !

नमस्कार मित्रांनो, आज आमच्या नवीन पोस्टमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच की आजच्या युगात मानवासाठी पैसा हा सर्वकाही आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये असे काही सुपरस्टार्स आहेत ज्यांनी पैशापेक्षा त्यांच्या प्रतिष्टेला जास्त महत्त्व दिले आहे.
४. रजनीकांत – मित्रांनो सुपरस्टार रजनीकांत यांना त्यांच्या सौदार्यासाठी ओळखले जातात. २०१४ मध्ये ‘लिंगा’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांनी उदारपणे याकडे पाहिले आणि त्यांची फी असलेली किमंत २५ कोटी रूपये परत केले. २००२ मध्येही असेच घडले होते. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या ‘बाबा’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ५ कोटीं रुपयांचा मोठा तोटा सहन करावा लागला होता. या चित्रपटाचे मुख्य अभिनेते रजनीकांत यांनी स्वत: हे नुकसानाची जबाबदारी घेतली होती.
३. रणबीर कपूर – मित्रांनो, रणबीर कपूर हा खानदानी श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही. रणबीर कपूरने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात सावरीया या चित्रपटाने केली होती. तो चित्रपट हि फारसा बॉक्स ऑफिस वर जादू दाखवू शकला नाही पण त्यानंतर काही चित्रपटामुळे तो तरुणांचा चाकलेट बॉय म्हणून ओळखु लागला. नंतर पुन्हा त्याचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. रणबीर कपूरने आपल्या जग्गा जासूस या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान असेही म्हटले होते की जर चित्रपट चालला नाही तर वितरकांचे नुकसान होऊ देणार नाही. त्याचवेळी, जग्गा जसूससुद्धा बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला, तेव्हा रणबीर कपूरने वितरकांना २० कोटींच्या नुकसानीपासून वाचवले होते.

२. शाहरुख खान – बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखले जाणारे शाहरुख खान या प्रकरणात कोणापेक्षा कमी नाही. तो रोमांस किंग म्हणून ओळखला जातो. एक काळ हा त्याच्या चित्रपटांचा काळ होता असं म्हणण्यास हरकत नाही कारण अनेक सुपरहिट चित्रपट शहरुख यांनी केले. त्याच बरोबर लाही चित्रपट फ्लॉप सुद्धा झाले. शाहरुख खानने ‘जब हॅरी मेट सेजल’साठी ६० कोटींचे नुकसानाची जबादारी घेतली होती. त्याच चित्रपट ‘जीरो’ फ्लॉप झाल्यानंतरही यशराज डिस्ट्रिब्यूटर्सला ५० टक्के म्हणजे ५५ कोटी रुपयांचे नुकसान भरपाई करण्याचे आश्वासन दिले होते.
१. सलमान खान – सलमान खान एक अभिनेता आहे ज्याने नेहमी पैशाला कमी महत्व दिले आहे. त्याचे चित्रपट हे त्याच्या नावावर आजची चालतात. अनेकांना या सिने विश्वात लाँच करणारा हा अभिनेता अनेक वेळा आपल्याला चढ उतारातुन जाताना दिसतो. त्याचे काही सिनेमे हिट होतात तर काही चित्रपट एकदमच फ्लॉप होतात. आपणास माहिती आहेच की सलमान खानचा चित्रपट ट्यूबलाइट हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. निर्मात्यांनी ट्यूबलाइटला १३० कोटी रुपयांना विकत घेतला होता आणि सलमान खानने ५० टक्के म्हणजेच ६५ कोटीपर्यंतची रक्कम परत केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *