भारतातील श्रीमंत व्यक्ती म्हणून सर्वात पहिले मुकेश अंबानी यांचे नाव आपल्या डोळ्यासमोर येते. मुकेश अंबानी हे फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यामुळेच श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचा पाचवा क्रमांक लागतो.
तुम्हाला ठाऊक आहे का की मुकेश अंबानी यांची संपत्ती अनेक देशांच्या जीडीपी पेक्षा सुद्धा जास्त आहे. हो हे खरे आहे! इतक्या वेळात एक सामान्य माणूस चहा पितो, इतक्या वेळात मुकेश अंबानी यांची करोडो रुपयांची कमाई झालेली असते. आज आम्ही तुम्हाला मुकेश अंबानी यांच्या संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. मुकेश अंबानी यांची २३ लाख रुपये प्रति मिनिटांची कमाई आहे असे म्हटले जाते. मागील दहा वर्षांमध्ये त्यांनी त्यांची संपत्ती ३ गुणांनी वाढवली आहे.
आकडेवारी मध्ये सांगायचे झाल्यास २०१० मध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती २७ मिलियन डॉलर च्या आसपास होती तर आता २०२० मध्ये त्यांची संपत्ती ८० मिलियन डॉलर झाली आहे.
मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईतील महालक्ष्मी या प्रतिष्ठित विभागात राहते. तेथे त्यांचे २७ मजल्यांचे एंटीलिया नावाचे घर आहे. मुंबई सारख्या भागात डौलात उभी असलेली ही इमारत पाहून अनेकांचे नेत्र सुखावतात. या आलिशान घराची किंमत सध्याच्या काळात बारा हजार करोड रुपये इतकी आहे.
हे घर बनवण्यासाठी सात हजार करोड रुपयांहून अधिक खर्च आला होता. त्यामुळेच हे घर जगभरातील सर्वात महागड्या अलिशान घरांपैकी एक म्हणून गणले जाते. या घराला अमेरिकेतील परकिंस अँड विल या नामांकित कंपनीने बनवले. हे घर २७ मजल्यांचे आहे.
या घरात अंबानी कुटुंबातील ५ जण राहतात मात्र घराला मेंटेन ठेवण्यासाठी ६०० लोक ठेवले आहेत. या घरातील प्रत्येक मजल्याचे इंटिरियर इतर मजल्यांपेक्षा पेक्षा वेगळे आहे.
अंबानी यांची भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीपेक्षा चौपट संपत्ती आहे. राधाकिशन दमानी हे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. राधाकिशन दमानी हे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. हे एक स्टॉक मार्केट इन्वेस्टर आहेत. सध्या त्यांचे भारतभर डी मार्ट स्टोअर च्या ब्रांचेस आहेत.
२०१९ मध्ये मुकेश अंबानी यांच्याकडे प्रति दिवस ३३ करोड रुपयांहून अधिक कमाई व्हायची असे रिपोर्टमध्ये म्हटले गेले होते. वर्ल्ड बँक डाटाने दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान, बोत्सवाना आणि बोस्निया यांसारख्या देशांच्या एकूण जीडीपीला जोडले तरीही मुकेश अंबानींच्या संपत्तीपेक्षा ती कमीच पडते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !